अमरावती विभागातील एसटी प्रवाशांसाठी सुखद धक्का; १५ कोटींच्या ‘हायटेक’ मार्ग निवाऱ्यांना मंजुरी

By गणेश वासनिक | Updated: April 4, 2026 18:58 IST2026-04-04T18:46:09+5:302026-04-04T18:58:00+5:30

Amravati : अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळमधील एसटी स्थानकांचा कायापालट होणार; अद्ययावत सुविधा मिळणार

Pleasant shock for ST passengers in Amravati division; Approval for 'hi-tech' route improvements worth Rs 15 crore | अमरावती विभागातील एसटी प्रवाशांसाठी सुखद धक्का; १५ कोटींच्या ‘हायटेक’ मार्ग निवाऱ्यांना मंजुरी

Pleasant shock for ST passengers in Amravati division; Approval for 'hi-tech' route improvements worth Rs 15 crore

अमरावती : रस्त्यावरील ‘लालपरी’च्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या चारही विभागांमधील महत्त्वाच्या थांब्यांवर अद्ययावत ‘प्रवासी निवासी मार्ग निवारे’ बांधण्यासाठी राज्य सरकारने १५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ऊन, वारा आणि पावसापासून प्रवाशांचे संरक्षण होण्यासोबतच त्यांना आधुनिक सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.

शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार, हे मार्ग निवारे केवळ थांबे नसून ते एका ‘मिनी बस स्थानका’प्रमाणे विकसित केले जातील. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या विभागांमधील मुख्य मार्ग आणि ग्रामीण भागातील वर्दळीच्या ठिकाणी हे निवारे उभारले जातील. आधुनिक वास्तुकला आणि मजबूत लोखंडी किंवा काँक्रीटच्या रचनेचा वापर करून हे निवारे आकर्षक बनविले जातील.

प्रवाशांना मिळणाऱ्या ‘स्मार्ट’ सुविधा 

- बैठक व्यवस्था : प्रवाशांसाठी आरामदायी आणि पुरेशी आसनव्यवस्था.
- स्वच्छता गृहे : महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची सोय.
- पिण्याचे पाणी : शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था.
- माहिती फलक : बसच्या वेळापत्रकासाठी डिजिटल किंवा अद्ययावत माहिती फलक.
- सुरक्षा : रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना.
- हिरकणी कक्ष : स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र ‘हिरकणी कक्षाची’ तरतूद काही महत्त्वाच्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे.

विभागीय वाटप आणि अंमलबजावणी

शासनाने एकूण १५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली असून, याचे वाटप चारही विभागांच्या निकडीनुसार केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महामंडळाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. एमएसआरटीसीच्या अधिकृत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
 

Web Title : अमरावती एसटी यात्रियों के लिए हाई-टेक आश्रयों को मंजूरी, राहत

Web Summary : अमरावती विभाग के एसटी बस यात्रियों को राहत मिलेगी क्योंकि सरकार ने आधुनिक बस आश्रयों के लिए ₹15 करोड़ मंजूर किए। इन आश्रयों में बैठने, स्वच्छ शौचालय, पेयजल, सूचना प्रदर्शन और बेहतर सुरक्षा जैसी सुविधाएं होंगी, जिससे चार जिलों में यात्रियों के आराम और सुविधा में सुधार होगा।

Web Title : Amravati ST Travelers to Benefit from Approved Hi-Tech Shelters

Web Summary : Amravati division's ST bus travelers will benefit as the government approved ₹15 crore for modern bus shelters. These shelters will provide amenities like seating, clean restrooms, drinking water, information displays, and enhanced security, improving passenger comfort and convenience across four districts.