शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रासाठी सुखद वार्ता; सहा दिवसांत एकही विद्यार्थी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १८२४४९ पैकी ७३५४५ विद्यार्थ्यांनी ...

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १८२४४९ पैकी ७३५४५ विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थिती नोंदविली. कोरोना विषाणूचा आलेख कमी-जास्त होत असताना गत सहा दिवसांत एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी सुखद वार्ता मानली जात आहे.

राज्य शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. असे असले तरी शिक्षणाची दारे खुली करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण वर्गात सुरू झाले आहे. विज्ञान, गणित, इंग्रजी विषयाच्या शिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहे. मात्र, पाचवी ते आठवीचे विदयार्थी घरीच लॉकडाऊन होते. ऑनलाईन शिक्षण घेत असताना आता शाळांमध्ये ऑफलाईन देण्यात येत आहे. कोरोनाची दहशत कायम आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. तूर्तास काही पालकांनी अद्यापही मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या ८९०४ पालकांनी अद्यापही संमतिपत्र शाळांना लिहून दिले नाही. शाळा सुरू होऊन सहा दिवसांचा कालावधी झाला असताना एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभाग, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

------------------

थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिजन तपासणीला प्राधान्य

शाळेच्या प्रवेश द्धारावरच विद्यार्थ्यांची दरदिवशी थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिजन तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. त्याकरिता शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असेल, असे वर्गात नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत शाळेत एकाही विद्यार्थ्याला ताप आला म्हणून घरी परत केले नाही वाकोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत, असे उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

----------------

पाचवी ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या

अचलपूर- ४३०१

अमरावती- ५८६२

अंजनगाव सुर्जी- ३७५४

भातकुली- २४५९

चांदूर बाजार- ८७८०

चिखलदरा- ४८३८

चांदूर रेल्वे- २६७३

दर्यापूर- ४५४६

धारणी- ४२१३

धामणगाव रेल्वे- २९०७

मोर्शी- ४४४६

नांदगाव खंडेश्वर- ४०९१

तिवसा- २७६२

वरूड- ६७१३

अमरावती महापालिका- ११२००

--------------

५७ शिक्षक आढळले संक्रमित

जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे १९९४ वर्ग आहेत. एकूण ७३१८ शिक्षकांकडे या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी आहे. २३ ते २५ जानेवारी दरम्यान ५३१९ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.