महानगर पालिकेतर्फे वृक्षारोपण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:21 AM2018-07-02T01:21:06+5:302018-07-02T01:21:20+5:30

१३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत रविवारी महापालिकेच्यावतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. नेहरू मैदानातून सुरू झालेल्या या वृक्षदिंडीत महापौर संजय नरवणे, आयुक्त संजय निपाणे यांच्यासह समस्त पदाधिकारी व अधिकारी सहभागी झाले. त्यानंतर विविध प्रभागात नगरसेवकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Plantation campaign by Metropolitan Municipal Corporation | महानगर पालिकेतर्फे वृक्षारोपण मोहीम

महानगर पालिकेतर्फे वृक्षारोपण मोहीम

Next
ठळक मुद्देझोननिहाय वृक्षारोपण कार्यक्रम : लोकप्रतिनिधी, जनतेला सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत रविवारी महापालिकेच्यावतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. नेहरू मैदानातून सुरू झालेल्या या वृक्षदिंडीत महापौर संजय नरवणे, आयुक्त संजय निपाणे यांच्यासह समस्त पदाधिकारी व अधिकारी सहभागी झाले. त्यानंतर विविध प्रभागात नगरसेवकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
१ ते ३१ जुलै या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात एक महिना वृक्ष लागवड करायची असल्याने झोननिहाय महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी, पक्षीप्रेमी, सामाजिक संघटना व नागरिकांनी आपला लोकसहभाग नोंदवावा, असे आवाहन अमरावती महापालिकातर्फे करण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गंत अमरावती महानगरपालिकातर्फे शहरातील सर्व २२ प्रभागामध्ये वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येणार आहे. संबंधित नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्यामार्फत रविवारी रोजी वृक्षारोपण करण्यात आले. सदर अभियान १ ते ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रभागात सकाळी ११ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत प्रभागातील नगरसेवक व अधिकारी यांच्यामार्फत वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, करंज, चिंच, पापडा, आवळा, सीताफळ, जांभूळ अशाप्रकारे अनेक झाडाचे वृक्षारोपण मनपा प्रशासनतर्फे करण्यात येणार आहे.
झोन क्र. १ अंतर्गत सर्वज्ञ विहार, देशमुख लॉनच्या मागे झोन क्र. १ सभापती वंदना मंडघे, नगरसेवक विजय वानखडे, गोपाल धर्माळे, नगरसेविका सुचिता बिरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गंगोत्री कॉलनी येथे चंद्रकांत बोमरे, बाळू भुयार, नगरसेविका सुरेखा लुंगारे, विधी समिती उपसभापती प्रमिला जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अभियंता कॉलनी ओपन स्पेस येथे महिला बाल कल्याण समिती सभापती स्वाती जावरे, नगरसेवक प्रशांत डवरे, नगरसेविका निलीमा काळे, मंजुश्री महल्ले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मनपा दवाखाना, खैरियानगर येथील संजय वानरे, धीरज हिवसे, नीता राऊत, माधुरी ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रामपुरी कॅम्प झोन कार्यालयात झालेल्या वृक्षारोपणात महापौर संजय नरवणे, नगरसेवक राजेश साहु, नगरसेविका कुसुम साहु आदी उपस्थित होते.
वृक्षलागवड उपक्रमात बाजार समितीचा सहभाग
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वृक्षारोपण दिनानिमित्य समितीचे धान्य यार्ड आवार तसेच बडनेरा, शिराळा आष्टी, खोलापूर, भातकुली या उपबाजार समितीच्या आवारात रविवार १ जुलै रोजी समितीचे सभापती प्रफुल्ल राऊत, उपसभापती नाना नागमोते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. समितीतर्फे एकूण २२५ झाडांचे वृक्षारोपण समितीचे संचालक अशोक दहीकर, प्रवीण भुगूल, विकास इंगोले, प्रमोद वानखडे, तालुका उपनिबंधक राजेंद्र पालेकर, समितीचे सचिव दीपक विजयकर, सहायक सचिव भुजंग डोईफोडे, प्रवीण पवार, राजेश इंगोले, के. एस. मोरे, सुधाकर खोरगडे, किरण साबळे, तालुका उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी अविनाश महल्ले, एस. के. रोकडे, पी. आर. देशमुख यांनी वृक्ष लागवडीत सहभाग घेतला. वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे जतन करण्याची ग्वाही बाजार समिती संचालकांनी दिली.

Web Title: Plantation campaign by Metropolitan Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.