कौंडण्यपूर येथून पिस्टल, तलवारी, रॉड जप्त; सात आरोपींना अटक

By प्रदीप भाकरे | Updated: June 12, 2025 18:16 IST2025-06-12T18:15:46+5:302025-06-12T18:16:07+5:30

Amravati : कुऱ्हा पोलिसांची कारवाई

Pistols, swords, rods seized from Koundanyapur; Seven accused arrested | कौंडण्यपूर येथून पिस्टल, तलवारी, रॉड जप्त; सात आरोपींना अटक

Pistols, swords, rods seized from Koundanyapur; Seven accused arrested

प्रदीप भाकरे 
अमरावती :
दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने एका शिवारात दडलेल्यासात आरोपींना कुऱ्हा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅक्झिन, दोन जीवंत काडतूस, दोन तलवारी, लोखंडी रॉड, काठी, दोन दांडके, चारचाकी व दुचाकी असा एकूण २ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ११ जून रोजी मध्यरात्रीनंतर कौंडण्यपूर येथील अंजनसिंगी टी-पॉइंटलगतच्या एका शेतात ही जंबो कारवाई करण्यात आली.
             

अटक आरोपींमध्ये शेख शानू शेख जब्बार (३५, रा. इतरवारा बाजार, वर्धा), अनिल सुरेश परियाल (४२, रा. महादेवपुरा, वर्धा), शेख शाहरूख शेख रऊफ (३०, रा. महाराणा प्रताप वॉर्ड, आर्वी), मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन (३०, रा. गोरक्षण वॉर्ड, आर्वी), आदित्या किशोर डाकोडे (२०, रा. देऊरवाडा, वर्धा), शेख साबीर शेख कदीर (३५, रा. जनता नगर, आर्वी) व प्रतिक बाबाराव ठाकरे (३२, रा. रेल्वे स्टेशन, वर्धा) यांचा समावेश आहे. कौंडण्यपूर येथील अंजनसिंगी टी-पॉइंटलगत असलेल्या एका शेतात काही जण पिस्टलसह घातक शस्त्रे बाळगून असल्याची माहिती बुधवारी रात्री कुऱ्हा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या शेतात धाड टाकली. पोलिसांनी सातही आरोपींना जागीच पकडून त्यांची चौकशी केली. पोलिसांनी त्या शेतातील टिनाची खोली व खोलीमागील शेताची पाहणी केली. त्यावेळी तेथे दोन तलवारी मिळून आल्या.

कारची डिक्कीत पिस्टल
खोलीसमोर असलेल्या कारच्या डिक्कीत एका कापडी पिशवीत देशी बनावटीचे पिस्टल, मॅक्झिन, दोन जीवंत काडतूस आढळून आले. तर, रस्त्यालगतच्या दुचाकीच्या साइड गार्डला लोखंडी रॉड, काठी व दोन लाकडी दांडकेही आढळून आलेत. पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कुऱ्ह्याचे ठाणेदार अनुप वाकडे, पोलीस उपनिरीक्षक विलास थुल, सोमेश्वर सपाटे, योगेंद्र लाड, अनिल निंघोट, उमेश वाघमारे, ज्ञानेश्वर देवतळे, सागर निमकर, दर्पण बनसोड, अक्षय विरघट, कुणाल भोयर यांनी केली.

Web Title: Pistols, swords, rods seized from Koundanyapur; Seven accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.