शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

मणिबाईत ‘पिंक रूम’; आरोग्यदायी शिक्षणाची उजळली पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:32 IST

वयात आलेल्या मुलींना शाळेत अंतर्गत समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक मणिबाई गुजराती महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता 'पिंक रूम' साकारली आहे. ही राज्यातील पहिलीच संकल्पना असल्याचे प्राचार्य अंजली देव यांनी सांगितले.

ठळक मुद्देराज्यातील पहिला उपक्रम : विद्यार्थिनींच्या नाजूक प्रश्नावर शोधले सकारात्मक उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वयात आलेल्या मुलींना शाळेत अंतर्गत समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक मणिबाई गुजराती महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता 'पिंक रूम' साकारली आहे. ही राज्यातील पहिलीच संकल्पना असल्याचे प्राचार्य अंजली देव यांनी सांगितले.गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मणिबाई गुजराती महाविद्यालयात 'पिंक रेस्ट रूम फॉर गर्ल्स' या संकल्पनेतून 'पिंक रूम' निर्माण करण्यात आली आहे. मुलींचा शिक्षणात टक्का वाढावा, कौटुंबिक अडचणींमुळे अनेक पालक आपल्या मुलीला इयत्ता सातवीपर्यंत शिकविण्याचा विचार करीत होते. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींची प्रगती दिसून येत आहे. मात्र, शाळेत असताना मासिक पाळी आल्यास सुविधेअभावी कुचंबना होते. इतरांना माहिती झाल्यास बदनामी होण्याची शक्यता पाहता मुली शाळेत येण्याचे टाळतात. यामुळे अनेक मुलींनी शाळा सोडल्याचे निदर्शनास आले. त्यावर स्थानिक मणिबाई गुजराती हायस्कूलच्या प्राचार्य अंजली देव यांनी मुलींच्या सुविधेसाठी 'पिंक रुम'ची संकल्पना साकारली. 'पिंक रुम'मध्ये नॅपकीन पॅडच्या मशीन्स, व्हिलचेअर, आराम करण्याकरिता बेडरूमची व्यवस्था करण्यात आली. यासाठी संस्थाध्यक्षांसह समितीने प्रोत्साहन दिल्याने हे साध्य झाले. 'पिक रुम'चे उद्घाटन नुकतेच झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसा दिलीप पोपट, प्रमुख अतिथी रेखा दिलीप वस्तानी, पश्मी परेश राजा, जयश्री नीलेश लाठीया, स्मिता हर्षद उपाध्याय, सोनल भरत भायानी, अल्का जितेंद्र दोशी, हेमा देसाई, वंदना लाठीया, पीएसआय कान्होपात्र बन्सा, प्राजक्त धावडे, प्राचार्य अंजली देव, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दया चव्हाण, पर्यवेक्षिका आशा कोष्टी व मोहना कुळकर्णी, प्राची पालकर, प्रिया तुषार भारतीय, अनिता कुळकर्णी, वैशाली देसाई उपस्थित होत्या. पिंक रूमची उपयोगिता, वैशिष्ट्य व संकल्पना मोहना कुलकर्णी यांनी विशद केली. पाहुण्यांचा परिचय शिक्षिका सरिता गायकवाड यांनी करून दिला. संचालन मृणाल देशमुख, वांशिका हरवाणी यांनी, आभार वैशाली भंगाळे यांनी मानले.हजार मुलींचा प्रवेशमणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये इयत्ता ७ वी ते १० वीपर्यंत हजार मुली शिक्षणाचे धडे घेत असून, त्यांच्या अंतर्गत अडचणीमुळे शिक्षणात बाधा येऊ नये, यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कुणी त्रस्त करीत असल्यास हेल्पलाईन क्रमांकदेखील मुलींना देण्यात आले आहे.मुलींची ही खरी निकड लक्षात घेऊन 'पिंक रुम' साकारली आहे. ज्या गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होतो, त्याचे आकर्षण अधिक असते. त्यातूनच क्राईम घडते. म्हणून प्रत्येक महाविद्यालयात हा उपक्रम राबविल्यास ही बाब सर्वसामान्य होऊन मुला-मुलींमधील भेद दूर होऊ शकेल.- अंजली देव, प्राचार्य, मणिबाई गुजराती कनिष्ठ महाविद्यालयही मुलींची खरी गरज आहे. परंतु, कुणासमोर समस्या मांडू शकत नाही. त्यामुळे शाळेत येण्याचे टाळणे हाच त्यावरील उपाय मुली मानतात. या संकल्पनेचे स्वागत आहे.- साक्षी अनासाने,विद्यार्थिनी, मणिबाई गुजरातीमहिलांनी महिलांसाठी साकारलेली ही संकल्पना प्रशंसनीय आहे. प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या मुलींसाठी ही आपत्कालीन सुविधा झाल्याचे समाधान वाटते.- सुरभी भेलकर,विद्यार्थिनी, मणिबाई गुजराती 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण