शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
5
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
6
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
7
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
8
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
9
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
10
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
11
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
12
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
13
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
14
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
15
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
16
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
17
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
18
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
19
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
20
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.तील बदल्यांच्या राजकारणाला पूर्णविराम

By admin | Updated: May 22, 2014 00:43 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी

अमरावती : जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतीसाठी असणारा कोटा यावर्षी शासनाने रद्द केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे काही पदाधिकार्‍यांकडे बदल्यांसाठी भरणारा बाजार बंद होणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे पदाधिकार्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या बहुतांश सदस्यांना आपल्या भागातील विकास कामांपेक्षा अन्य कामांतच अधिक छंद असतो. त्यामध्ये बदल्यांचा विषय तर काहीच्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. बदल्यांची प्रक्रिया मार्चपासून सुरु होते. पण यावेळी आचाससंहितेमुळे ती आता सुरु झाली आहे. यावर्षी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार नाही. त्यामुळे राहिलेल्या कर्मचार्‍यांमध्ये बदलीस पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या निश्‍चित केली आहे.

कर्मचार्‍यांच्या बदल्या ही पूर्णपणे प्रशासकीय बाब मानली जाते, तरीही यात अधिकार्‍यांपेक्षा पदाधिकारी आणि सदस्य यांनाच अधिक रस असतो. प्रशासनप्रमुख कडक असतील तर ते पदाधिकारी किंवा सदस्य यांना फारशी किंमत न देता थेट आपल्या पातळीवर पारदश्रीपणे ही प्रक्रिया पार पाडतात. यातून अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतींसाठी बदल्यांचे काही अधिकार दिले होते.

सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर एक महिन्याने जिल्हा परिषद अध्यक्षांना सर्व संवर्ग मिळून २0 बदल्या करण्याचे अधिकार होते. तक्रारी किंवा विनंतीच्या आधारे वर्षभरात केव्हाही बदलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदलीची शिफारस केल्यास मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधितांची रिक्त पदावर बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येत होते. यातही तालुक्यात जास्तीत जास्त तीन बदल्या करण्याचे अधिकार अध्यक्षांना होते. तसेच पंचायत समिती सभापतींनाही १0 बदल्या करण्याचे अधिकार होते. यामध्ये गटविकास अधिकारी आदेश निर्गमित करत असत, त्यामुळे प्रशासकीय बदली होत नसलेले कर्मचारी, पदाधिकारी किंवा सदस्यांना आपसी बदली करण्यासाठी पैसे उतळत असत. यावर्षी शासनाने बदलीचा पदाधिकार्‍यांना दिलेला कोटाच रद्द केला आहे. त्यामुळे बदलींसाठी पदाधिकार्‍यांच्या दालनातील गर्दी कमी होणार आहे.