महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान लोकप्रतिनिधींना
By Admin | Updated: April 26, 2015 00:28 IST2015-04-26T00:28:02+5:302015-04-26T00:28:02+5:30
महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींना ध्वजवंदनाचा मान राज्य शासनाने दिला आहे.

महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान लोकप्रतिनिधींना
अमरावती : महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींना ध्वजवंदनाचा मान राज्य शासनाने दिला आहे. मात्र, महाराष्ट्र दिनापुरताच हा मान लोकप्रतिनिधींना मिळेल. स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट आणि प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला मात्र तहसीलदारांच्या हस्ते ध्वजवंदनाची परंपरा कायम राहणार आहे.
महाराष्ट्रदिनी विभागीय आयुक्तालय,जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. मात्र, तालुका मुख्यालयी तहसीलदारांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणावर आमदारांनी आक्षेप घेऊन हा मान लोकप्रतिनिधींना मिळावा, अशी मागणी केली होती. ही मागणी राज्य शासनाने मान्य केली आहे.