coronavirus; जनता कर्फ्यु; अमरावतीत कमालीचा सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 14:21 IST2020-03-22T14:20:46+5:302020-03-22T14:21:16+5:30
इतिहासात पहिल्यांदाच अमरावतीत कमालीचा सन्नाटा पाहावयास मिळाला.

(छायाचित्रे-- मनीष तसरे, अमरावती)
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी जनता कफ्युर्ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इतिहासात पहिल्यांदाच अमरावतीत कमालीचा सन्नाटा पाहावयास मिळाला. सकाळपासूनच रस्ते ओस तर, बाजारपेठेत शुकशुकाट होता. बहुतांश रेल्वे गाड्या बंद होत्या. बसगाड्यांची चाके थांबली. खासगी वाहने, आॅटोरीक्षा, शहर बस बंद असल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्यांना पायी घरी गाठावे लागले. मात्र, कर्फ्युदरम्यान सुरक्षेसाठी पोलीस तैनात होते.