शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावरील फुटपाथ गॅरेजधारकांकडून गिळंकृत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

नव्या रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याच्या शेजारी हॉटेल, दुचाकी शोरूम, पानटपऱ्या आहेत. त्या रस्त्यावर काही गॅरेजदेखील आहेत. त्या गॅरेजमध्ये येणारी शेकडो वाहने फुटपाथ व रस्त्यावर लागतात. शवागाराच्या आधीदेखील ती रस्त्याशेजारची जागा वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी बळकावली आहे, तर दुचाकी शोरूमलगत असलेल्या गॅरेजवाल्यांनी फुटपाथ व अर्धा रस्ता कवेत घेतला आहे. त्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक शाखेने दुर्लक्ष चालविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील विविध रस्त्यांवर फुटपाथ तयार करण्यात आले खरे, पण अनेक भागांत हे फुटपाथ हातगाड्यांनी बळकावले आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आणि हातगाडीवाल्यांच्या डोक्यावरील राजकीय वरदहस्तामुळे सर्वसामान्यांचा पायी चालण्याचा अधिकारच हिसकावला. राजकीय हस्तक्षेपामुळे फुटपाथवरील हातगाड्या हटविण्यास महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक कानाडोळा करीत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे. इर्विन ते रेल्वे स्टेशन रोडवरील फुटपाथ व रस्ता गॅरेजधारकांनी गिळंकृत केला आहे.रेल्वे स्टेशन चौक ते इर्विन चौकापर्यंत मागील वर्षी रुंद असा सिमेंट रस्ता बांधण्यात आला. रेल्वे स्टेशनच्या बाजूची जागा रेल्वेच्या अखत्यारीतील असल्याने नवीन रेल्वे स्थानकाला लागून फारसे अतिक्रमण नाही. मात्र, नव्या रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याच्या शेजारी हॉटेल, दुचाकी शोरूम, पानटपऱ्या आहेत. त्या रस्त्यावर काही गॅरेजदेखील आहेत. त्या गॅरेजमध्ये येणारी शेकडो वाहने फुटपाथ व रस्त्यावर लागतात. शवागाराच्या आधीदेखील ती रस्त्याशेजारची जागा वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी बळकावली आहे, तर दुचाकी शोरूमलगत असलेल्या गॅरेजवाल्यांनी फुटपाथ व अर्धा रस्ता कवेत घेतला आहे. त्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक शाखेने दुर्लक्ष चालविले आहे. तेथील गॅरेजसमोर रोज १००/ १५० वाहने अस्ताव्यस्त फुटपाथवर लावलेली असतात.चित्रा चौकातून इतवारा बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रांगेत हातगाड्या लागतात. या हातगाडीकडे येणारे अनेक जण भररस्त्यावर दुचाकी उभ्या करतात. शहरातील मुख्य बाजारपेठेत फुटपाथ नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना रस्त्यांवरूनच वाहने चुकवत पायी जावे लागते. व्हीआयपी रस्त्यावर काही ठिकाणी फुटपाथ आहेत. मात्र तेही गायब झाले. काही ठिकाणी फुटपाथवर हातगाड्या, तर काही ठिकाणी पार्किंगसाठी जागा करून घेण्यात आली. 

फुटपाथचा वापर हातगाड्यांसाठी - शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून विविध रस्त्यांवर फुटपाथ तयार करण्यात आले. या फुटपाथचा उपयोग शहरवासीयांना चालण्यासाठी व्हावा, असा उद्देश होता. मात्र या फुटपाथचा वापर हातगाड्या उभ्या करण्यासाठी केला जात आहे. महापालिकेच्या बाजूला असलेल्या अंबादेवी मार्गावरील फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून कपडे, कपबशी आणि अन्य हातगाड्या लावण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण