समाजविकासाचा मार्ग सत्तेच्या खुर्चीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:48 IST2018-06-09T22:48:21+5:302018-06-09T22:48:21+5:30
कोणत्याही समाजाचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी सत्ता आवश्यक व महत्त्वाचे घटक आहे. सत्तेशिवाय समाजविकास शक्य नाही. म्हणून समाज विकासाचा मार्गच सत्तेतून जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. ते माळी समाजाचे सामाजिक चिंतन शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

समाजविकासाचा मार्ग सत्तेच्या खुर्चीतून
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोणत्याही समाजाचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी सत्ता आवश्यक व महत्त्वाचे घटक आहे. सत्तेशिवाय समाजविकास शक्य नाही. म्हणून समाज विकासाचा मार्गच सत्तेतून जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. ते माळी समाजाचे सामाजिक चिंतन शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
भारतीय माळी समाज युवा संघटनेच्यावतीने स्थानिक जावरकर मॅरेज हॉलमध्ये माळी समाज राजकीय, सामाजिक चिंतन शिबिर सोमवारी पार पडले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने शिबिराची सुरुवात झाली. प्रास्ताविक डी.एस. यावतकर यांनी केले.
युवा उद्योजक नंदकिशोर वाठ, हर्षद जावरकर, सचिन राऊत, निखिल टेंभरे, सूरज मेहरे, सुधीर घुमटकर, ज्योतिबा मेहरे, सुमीत यावले, ओमप्रकाश मालधुरे, प्रदीप निमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रवीण उमक, सुनील देशमुख, सुयोग यावले, करण डहाके, शुभम तिखे, प्रणव बनसोड, श्रीकांत लांडे, रोशन खैरे, किशोर कळस्कर, निखिल चर्जन, दर्शन काळे, अजिंक्य बघाडे, भावेश श्रीखंडे, आकोलकर, ढाकूलकर, आचरकाटे, कुणाल उमक आदी उपस्थित होते.