शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
2
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
4
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
5
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
6
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
7
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
8
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
9
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
10
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
11
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
12
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
14
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
15
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
16
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
17
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
18
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
19
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
20
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
Daily Top 2Weekly Top 5

इंदलानजीकच्या विहिरीत अर्धवट जळालेला औषधीसाठा आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

ले-आऊटमधील प्लॉट बघण्याकरिता गुरुवारी दुपारी ते गेले होते.  परिसरात फिरत असताना त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता, त्यांना आठ ते १० पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत औषधीसाठा आढळून आला. त्यांनी याची माहिती ‘लोकमत’ला दिली. घटनास्थळी भेट दिली असता, औषधीसाठ्यांपैकी काही औषधांची मुदत २०२२ पर्यंत असल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देखळबळ, मुदत संपण्यापूर्वीच फेकला औषधी साठा

मनीष तसरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावानजीकच्या शेतातील एका अर्धवट बांधकाम केलेल्या विहिरीत अपूर्ण जळालेले आठ ते १० पोते औषधीसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. यातील काही औषधांची मुदतसुद्धा संपायची आहे. त्यामुळे हा साठा येथे कुणी आणला?   कशासाठी फेकून दिला?  याचा शोध पोलिसांनी व औषधी प्रशासन विभागाने घ्यावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्राप्तमाहितीनुसार, शिवाजी किरकटे, मंगेश कोकाटे व बिजवे हे इंदला गावानजीकच्या शेतात ले-आऊट पडले आहे. या ले-आऊटमधील प्लॉट बघण्याकरिता गुरुवारी दुपारी ते गेले होते.  परिसरात फिरत असताना त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता, त्यांना आठ ते १० पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत औषधीसाठा आढळून आला. त्यांनी याची माहिती ‘लोकमत’ला दिली. घटनास्थळी भेट दिली असता, औषधीसाठ्यांपैकी काही औषधांची मुदत २०२२ पर्यंत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर औषधी कशासाठी फेकण्यात आल्या? त्या कालबाह्य आहे का? जर असतील तर अशाप्रकारे उघड्यावर फेकणे नियमबाह्य नव्हे काय? याचा तपास पोलीस व एफडीएच्या अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :medicinesऔषधं