अमरावती येथे मार्केटचा एक भाग कोसळला; दोनजणांना वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:31 IST2020-07-16T11:30:51+5:302020-07-16T11:31:11+5:30
शहरातील जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधी मार्केटचा एक भाग बुधवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास अचानक कोसळला.

अमरावती येथे मार्केटचा एक भाग कोसळला; दोनजणांना वाचवले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: शहरातील जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधी मार्केटचा एक भाग बुधवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्याने तिथे अडकलेल्या दोन व्यक्तीना जीवदान मिळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
अधिक वृत्त लवकरच देत आहोत..