शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’मृत नवजातांच्या पालकांना प्रत्येकी दोेन लाख रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 17:04 IST

अमरावती, दि. 18 - : स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) चुकीच्या इंजेक्श्नमुळे मृत पावलेल्या ‘त्या’ चारही नवजातांच्या पालकांना जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाद्वारे प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. २९ मे रोजी मध्यरात्री डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एनआयसीयूत ही घटना घडली होती. हे प्रकरण राज्यभरात गाजले ...

अमरावती, दि. 18 - : स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) चुकीच्या इंजेक्श्नमुळे मृत पावलेल्या ‘त्या’ चारही नवजातांच्या पालकांना जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाद्वारे प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. २९ मे रोजी मध्यरात्री डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एनआयसीयूत ही घटना घडली होती. हे प्रकरण राज्यभरात गाजले होते, हे विशेष. या घटनेमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा हादरली होती. परिचारिकेने बाळांना दिलेल्या चुकीच्या औषधोपचारामुळेच चार नवजात दगावल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी एक निवासी डॉक्टर व दोन परिचारिकांना अटक केली. मात्र, शिशुंच्या मृत्युसाठी पीडीएमसीतील काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या पालकांनी केला होता. दोषींवर कारवाई व्हावी, ही मागणी घेऊन मृतांचे पालक न्यायासाठी धडपडत होते. दरम्यान पोलीस चौकशी पूर्ण होऊन गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ जून रोजी दिलेल्या निर्णयात मृताच्या पालकांना दोन लाखांची आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाला दिले. त्यानुसार मृत शिशुंचे पालक पूजा आशिष घरडे, शिल्पा दिनेश विरूळकर, माधुरी बंटी कावरे, आफरीन बानो अब्दुल राजीक यांनी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर केले होते. ९ आॅगस्टपर्यंत मृतांच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी, असे उच्च न्यायालयाने बजावले होते. त्यानुसार जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडून चारही पालकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.