वीज पडल्याने बैल जोडी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST2021-03-20T04:13:18+5:302021-03-20T04:13:18+5:30

विज रोहित्र जळून खाक: धामणगाव रेल्वे : गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पाऊस व विजेचा कडकडाटामुळे बैल जोडी ठार ...

A pair of oxen were killed by lightning | वीज पडल्याने बैल जोडी ठार

वीज पडल्याने बैल जोडी ठार

विज रोहित्र जळून खाक:

धामणगाव रेल्वे : गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पाऊस व विजेचा कडकडाटामुळे बैल जोडी ठार झाली. एका शेतकऱ्याच्या शेतातील वीज रोहित्र जळून खाक झाले. या घटना अंजनवती सैदापूर व वाढोणा येथे घडल्या. धामणगाव तालुक्यात गुरुवारी रात्री आठ वाजता वादळी पाऊस व विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. अंजनवती येथील शुभम नरेंद्र पंचबुद्धे यांच्या शेतात बैलजोडी बांधली होती. वीज अंगावर पडल्याने एक लाखांची ती बैलजोडी जागीच ठार झाली. वाढोणा येथील प्रणित प्रकाशराव गायकवाड यांच्या शेतातील वीज रोहित्र वीज पडल्याने जळून खाक झाले. धामणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले आहे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य राजकुमार केला यांनी केली आहे.

---------

पथ्रोटमध्ये बैल दगावला

पथ्रोट : येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील सुरेश गोल्हर यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज कोसळून तो दगावला. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुरेश गोल्हर यांचा मुलगा अविनाश (२९) हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

------------------

फोटो पी १९ गारपिट फोल्डरमध्ये नांदगाव

१२५ वर्षांचे कडूलिंबाचे झाड दोन घरावर कोसळले

पहूर येथील घटना : दोन चिमुकली बचावली

नांदगाव खंडेश्वर : गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पहूर या गावातील रस्त्याच्या कडेला असलेले सुमारे १२५ वर्षांचे पुरातन कडूलिंबाचे झाड दोन घरावर कोसळले. टीनपत्र्याचे त्या घरात चिमुकला सहा महिन्यांचा नैतिक पाळण्यात होता. आईच्या कडेवर असलेली अडीच वर्षांची आराध्यासह घरातील कुटुंबीय या घटनेत थोडक्यात बचावले.

हे कडुनिंबाचे झाड नामदेव मारबदे व राजू मारबदे यांच्या घरावर कोसळले होते. नामदेव मारबदे यांच्या घरात पती, पत्नी, मुले, नातवंडे यांच्यासह एकूण आठ जण वास्तव्याला आहेत. झाड कोसळल्यामुळे घराच्या टिनाला आधार असलेल्या लाकडी नाटा तुटल्या. त्याच एका नाटीला पाळणा बांधला होता. तसेच या घरात झोपण्याचा पलंग व बिछाना जिथे होता, त्यावरील नाट तुटली व तेथील टीनपत्रा त्यावर लोंबकळला. राजू मारबदे यांच्या घरात पती, पत्नी, दोन मुले असे चार जण वास्तव्याला होते. या घरातील कुटुंबीय थोडक्यात बचावले. ही घटना कळताच घटनास्थळी सरपंच अमृता नीलेश जेठे, ग्रामपंचायत सदस्य सूरज ठाकरे, गायत्री गजानन गावंडे, विभा गजानन मेश्राम, विजय मारबदे, विनोद कडू, मोरेश्वर भेंडे, पुंडलिक मारबदे, विठोबा मारबदे, सुदर्शन मेश्राम, दयाल गिरी, शैलेश खडसे, आजूबाजूची मंडळी घटनास्थळी दाखल झाली होती. ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाला या घटनेची माहिती दिली.

------------

धारणीत दुसऱ्या दिवशीही मुसळधार

धारणी : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी गारपिटीसह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात अनेक भागांतील हरभरा व गव्हाचे उभे पीक जमीनदोस्त झाले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा अवकाळी पावसाने तब्बल एक तास तालुक्यात हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामातील चना, गहू, मका अशा पिकांवर अवकाळी पावसाचा कहर बरसला. अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार अतुल पाटोळे यांनी अधीनस्थ तलाठ्यांना केले आहे.

---------------

फोटो पी १९ गारपीट फोल्डरमध्ये चिखलदरा

चिखलदरा तालुक्याला गारपीट, पावसाचा तडाखा

अढाव येथे २७ घरांचे छप्पर उडाले : दहेंद्री येथे बैल ठार

चिखलदरा : गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटने शेतीचे नुकसान झाले आहे. अढाव गावात वादळी वाºयाने २७ घरांचे छप्पर उडाले तर दहेंद्री येथे एक बैल ठार झाला. महसूल प्रशासनाच्या वतीने शुक्रवारपासून पंचनामा करायला सुरुवात झाली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा दुर्गम व अति दुर्गम भागामध्ये गुरुवारी सायंकाळी चार वाजतापासून अवकाळी पावसासह गारपीट झाली. काटकुंभ, चुरणी परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये गहू, चना व बागायती पालेभाज्या घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकारीऱ्यांना माहिती घेऊन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले.

अढाव येथे २७ घरांचे छप्पर उडाल्याची माहिती असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान नाही नुकसानाची पंचनामे सुरू असल्याची माहिती चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी दिली.

----------------------------------

फोटो पी १९ अंजनसिंगी

अंजनसिंगी परिसराला वादळी पावसाचा तडाखा

अंजनसिंगी : गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वादळासह पाऊस पडला. यात गव्हाचे पीक संपूर्णपणे नष्ट झाले. मोसंबीची झाडे उन्मळून पडली. अंजनसिंगी तसेच तिवसा तालुक्यातील आलवाडा, बोर्डा, दुर्गवाडा, धारवाड या परिसरामध्ये वादळाने थैमान घातले. रस्त्यावरची मोठमोठे झाडे उन्मळून पडली. तसेच मौजा आलवाडा येथील शेतकरी राजाभाऊ मनोहरे यांच्या शेतातील मोसंबीची झाडे वादळामुळे उन्मळून पडली.

------------------

फोटो पी १९ दर्यापूर नुकसान

दर्यापूर अंजनगावात गहू, पानपिपरीचे नुकसान

दर्यापूर/ अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव व शेजारच्या परिसरात तुरळक गारपीट झाली. यात पानपिपरी, गहू व अन्य पिकांचे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यात काही गावात मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती आहे. काही ठिकाणी उभ्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले.

---------------

फोटो पी १९ कु-हा फोल्डर

तिवसा तालुक्याला वादळाचा फटका

कुºहा : १८ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास तिवसा तालुक्यात अवकाळी वादळी पाऊस व गारपीट आणि विजेचा कडकडाटामध्ये गहू, चना, संत्रा आदी बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील कु-हा, व-हा, घोटा, माळेगाव, चेनुष्ठा, बोर्डा, हसनापूर, आलवाडा, दुर्गवाडा, जहागीरपूर, मारडा, वंडली, मिर्चापूर, छिदवाडी, कौंडण्यपूर, अंजनवती, मसदी, वाढोणा, सालोरा खुर्द आदी भागामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात घरांचे नुकसान झाले असून तर कुठे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला.

----------------

Web Title: A pair of oxen were killed by lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.