लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व ...
शहरालगतच्या नवबाग शिवारात महावितरणच्या डीबीवरील शॉर्टसर्किटने एका शेतकऱ्याचा तीन एकरांतील गहू व चारशे संत्राझाडे जळून खाक झाली. २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ...
बोअरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा झालेला अमर्याद उपसा व त्या तुलनेत जलपुनर्भरण होत नसल्याने सध्या अचलपूर तालुक्यातील भूजलस्तरात कमालीची घट आली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या १२.३६ मी. पातळीच्या तुलनेत सध्याची सरासरी पातळी १८.३० मी.पर्यंत कमी झाली आहे. ...
आमदार यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, बबलू शेखावत, नीलिमा काळे, प्रशांत डवरे यांच्यासह अनेक नेत्यांना सोमवारी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (३) एस.व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीनसाठी ही मंडळी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित हो ...
मेळघाटात अशिक्षितपणामुळे अनिष्ट रूढी कायम आहेत. त्यामुळेच आधुनिक सुधारणा स्वीकारण्याकडे त्यांचा कल नसतो. अशावेळी उभ्या ठाकलेल्या संकटातून निभावल्यास कौतुक होते. असेच कौतुक चाकर्दा येथील महिलेच्या वाट्याला आले आहे. ...
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. तथापि, संत्रा ऐन आंबिया बहराला आला असताना, पाणी टंचाईने तोंड वर काढले. विहिरी कोरड्या पडू लागल्या. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत अभियांत्रिकीसह बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी व अन्य शाखेच्या परीक्षांचे नियोजन ढासळले. चूक विद्यापीठाची मात्र मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ...
गतवर्षीचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला. १३ तालुक्यांत ५० पैशांचे आत पैसेवारी असल्याने दुष्काळस्थिती जाहीर झालेली आहे. अशा स्थितीत ७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाखांचा पीक विमा हप्ता भरणा केला. ...
अकोला राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलारा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे ...