नवनीत राणा यांच्या विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:15 AM2019-05-26T01:15:36+5:302019-05-26T01:16:15+5:30

महाआघाडीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्या विजयाची अंबानगरीतून शनिवारी भव्य रॅली काढण्यात आली. चाहत्यांनी त्यांचे ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात शहरातून अभूतपूर्व रॅली निघाली. हजारो कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी होती.

Navnit Rana's jolt to the victory | नवनीत राणा यांच्या विजयाचा जल्लोष

नवनीत राणा यांच्या विजयाचा जल्लोष

Next
ठळक मुद्देभव्य रॅली । अंबानगरीत चाहत्यांची अभूतपूर्व गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाआघाडीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्या विजयाची अंबानगरीतून शनिवारी भव्य रॅली काढण्यात आली. चाहत्यांनी त्यांचे ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात शहरातून अभूतपूर्व रॅली निघाली. हजारो कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी होती.
इर्विन चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी हारार्पण करून अभिवादन केले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली. पुढच्या वाहनात नवनीत राणा आणि त्यामागील वाहनात आमदार रवि राणा स्वार झाले होते. खासदार नवनीत राणा यांनी शहरातील नागरिकांना हात उंचावून सर्वांना नमस्कार केला व आशीर्वाद मागितला. येथून रॅली वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत जयस्तंभ चौकात पोहोचली. याठिकाणी राणा दाम्पत्याने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी आकाशात फटाके उडविले. नवनीत राणा यांचे स्वागत करण्यासाठी व्यापाऱ्यांची तोबा गर्दी उसळली होती. रॅलीदरम्यान महिला, मुली, व्यापारी व युवा वर्गाने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनीसुद्धा उत्साहाने पुष्पगुच्छ स्वीकारत मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या घोषणा आसमंतात निनादल्या.
नवनीत राणा यांच्या भव्य रॅलीने अमरावती शहर दुमदुमून निघाले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. महिलांनी डीजेवर ताल धरला. पुरुषांना ढोल-ताशावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी युवक-युवतींनीही नवनीत राणा यांच्यासोबत सेल्फी घेतली. येथून रॅली जवाहर गेट, सराफा बाजार, अंबागेट मार्गे बुधवारा, राजापेठ व तेथून अंबा-एकवीरामाता मंदिरात पोहोचली. या ठिकाणी राणा दाम्पत्याच्या हस्ते अंबादेवीची महाआरती करण्यात आली.
आभार रॅलीत नवनीत यांच्यासोबत माजी आमदार शरद तसरे, रावसाहेब शेखावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, हिंमत ढोले, चरणदास इंगोले यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी होते, आमदार रवि राणा यांच्या वाहनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश खारकर, जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी होते.

खासदारांना अभिवादनासाठी महिलांची गर्दी
खासदार नवनीत राणा यांच्या आभार रॅलीत डीजेच्या तालावर आबालवृद्धांनी ठेका धरला. व्यापारी प्रतिष्ठाने असलेल्या मार्गावरून रॅली जात असताना घरांवर, दुकानांवर जागा मिळेल तेथे महिला आणि तरुणी गर्दी करून उभ्या होत्या. सर्वाधिक कमी वयाच्या महिला खासदारांना अभिवादन करण्याची तीव्र इच्छा असलेल्या, घरातून डोकावणाºया तमाम महिलांना खासदार नवनीत यांनी आवर्जून अभिवादन केले.

युवा वर्गाचा जल्लोष
रॅलीमध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाली संख्या जास्त होती. यावेळी शहरात सर्वत्र आनंदोत्सव, जल्लोष साजरा करण्यात आला.

जिप्सी भरून फटाके
खासदार नवनीत राणा यांच्या विजयी रॅलीच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एक जिप्सी भरून फटाके आणले होते. फटाक्यांची आतषबाजी व व आकाशात फटाके उडवून केलेली रोषणाई यामुळे अंबानगरी दुमदुमून निघाली होती.

सेल्फी, व्हिडीओ
खासदार नवनीत राणा यांच्यासोबत सेल्फी काढण्याची आणि नवनिर्वाचित खासदारांचा व्हिडीओ शूट करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. गर्दीतून अनेक हात त्यासाठी पुढे येत होते. अभिवादन स्वीकारताना खासदार नवनीत त्यांनाही वेळ देत होत्या.

Web Title: Navnit Rana's jolt to the victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.