Travels overturned while overtaking, five injured | ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स उलटली, पाच जखमी
ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स उलटली, पाच जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरधाव ट्रॅव्हल्स एका वाहनाला ओव्हरटेक करताना रस्त्याच्या पलीकडे उलटल्याची घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावर लोणीनजीक घडली. अपघातातील दोन किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. एका तरुणीसह तिघांना उपचारासाठी अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात आणले.
स्वामी टूर्स अ‍ॅन्ड टॅÑव्हल्सची एमएच २८ एबी ९१९८ क्रमांकाची बस पुण्याहून अमरावतीत येत असताना शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास लोणी हद्दीतील मार्गावर अपघातग्रस्त झाली. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले. अपघातात दीपक सुधाकर जांबवाले (२७, रा.शेंदूरजना खुर्द), शुभम किशोर कुचे (२५,रा.कलेक्टर कॉलनी)सह पाच प्रवासी जखमी झाले. घटनेच्या माहितीवरून लोणीचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. घटनास्थळाचा पंचनामा करून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. या ट्रॅव्हल्सवर आ. सुरेश गोरे (खेड. ता.) असे लिहिलेले होते. पुण्यातच प्रवाशांनी ट्रॅव्हल्स मालकाशी संपर्क साधला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यातच अपुरी झोप झालेल्या अवस्थेत चालक टॅÑव्हल्स चालवीत होते. शुभम कुचे या प्रवाशाने फोन केला असता, ट्रॅव्हल्स मालकाने प्रतिसाद दिला नाही.
प्रवासात अनेक विघ्न
पुणे-अमरावती फेरी करणारी नियमित ट्रॅव्हल्स शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता निघण्यापूर्वीच बिघडल्याने ऐनवेळी प्रवाशांसाठी स्वामी टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सची बस अकोल्याहून बोलाविण्यात आली. ती रात्री १२.२० वाजता पुण्याहून अमरावतीकडे निघाली. त्यातच मेहकरजवळ डिझेल संपले. चालक-वाहकाने डिझेलचा बंदोबस्त केल्यानंतर ट्रॅव्हल्स पुन्हा अमरावतीकडे रवाना झाली. अखेरच्या टप्प्यात ती लोणीजवळ उलटली.


Web Title: Travels overturned while overtaking, five injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.