संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून हद्दपार करण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सीकडून अद्यापही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा डेटा प्रशासनाला मिळाला नाही. अगोदर देयके द्या, नंतरच विद्यार्थ्यांचा डेटा दिला जाईल, अशी भूमिका एजन्सीने घेतली आहे. ...
गाडगेनगर हद्दीतील दोन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दत्त विहाराजवळील मोहनदीप व साकेत कॉलनीत घरफोडीच्या या घटना घडल्या असून, रहिवाशांमध्ये पुन्हा चोरांची भीती निर्माण झाली आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. ज्योत्स्ना राजीव पवार (४३, रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत ...
यंदाच्या पावसाळ्यात काही ठिकाणी संततधार पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २३४ जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्या बाधित झाल्या आहेत. पावसामुळे मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळांच्या या इमारती कधीही कोसळू शकतात. ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया ...
धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारी टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्याऐवजी आता धनुर्वात आणि घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. ...
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी बुधवारी महापालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाची तपासणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्यात. ...