पूर्णा व साखळी नदीपात्रात बुडून चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:09 PM2019-08-19T21:09:30+5:302019-08-19T21:09:41+5:30

कुरळपूर्णा, जगतपूर येथील घटना : मृतांमध्ये बहीण भाऊ, तरुणांचा समावेश

four dead in Purna River in Amravati | पूर्णा व साखळी नदीपात्रात बुडून चौघांचा मृत्यू

पूर्णा व साखळी नदीपात्रात बुडून चौघांचा मृत्यू

googlenewsNext

चांदूरबाजार/नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : जिल्ह्यातील पूर्णा व साखळी नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चिमुकले बहीण-भाऊ व दोन तरुणांचा समावेश आहे. चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील पूर्णा नदीच्या पात्रात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी, तर बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर येथे रविवारी दुपारी घडली. 

चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील नदीपात्रात पोहण्याकरिता गेलेल्या दोन तरुणांचे मृतदेह सोमवारी रात्री आठच्या सुमारास पूर्णा नदीपात्राबाहेर काढण्यात आले. संकेत गायकवाड (२२, रा नारायणपूर, ता. अचलपूर) व आकाश राजेंद्र वानखडे (२०, रा. कुºहा, ता. चांदूरबाजार) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे  सोमवारी दुपारी दुचाकीने कुरळपूर्णा येथील पूर्णा नदीपात्रात पोहण्याकरिता आले होते. पूर्णेच्या पात्रात पहिल्यांदाच पोहण्यासाठी आलेल्या दोघा मित्रांना पाण्याच्या खोलीबाबत कल्पना नव्हती. अशातच सोमवारी दुपारी तालुक्यात सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाल्याने नदीपात्रातील जलसंचय वाढला. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.

दरम्यान ते बुडत असल्याची बाब काही गावकºयांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडही केली. तोपर्यंत दोन्ही तरुण बुडाले. याबाबत तलाठी व तहसीलदारांना माहिती देण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास अमरावतीहून आलेल्या पथकाने बुडालेल्या तरुणांचा शोध चालविला आहे. चांदूरबाजार नगरपालिकेची अग्निशमन पथकही घटनास्थळी आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धवल देशमुख, तहसीलदार उमेश खोडके व मंडळ अधिकारीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. एचजी इन्फ्रा या रस्ता बांधकाम कंत्राटदार कंपनीने नदीपात्रात दहा फूटपर्यंत खोदकाम केल्याने पात्रातील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गावानजीकच्या साखळी नदीपात्रात आंघोळीकरिता गेलेल्या दोन चिमुकल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. मंगरुळ चव्हाळा पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह नदीपात्राबाहेर काढले. शिवा दिनेश भोसले (७) व दीपाली दिनेश भोसले (९, दोघेही रा. जगतपूर) अशी मृत बहिनभावाची नावे आहेत. गावातील जि.प. शाळेत तिसºया वर्गाची विद्यार्थिनी असलेली दीपाली व तिचा दुसरीत शिकणारा शिवा हे दोघे रविवारी दुपारी २ ते ३ च्या सुमारास आई-वडील मजुरीला गेले असताना नदीपात्राकडे गेलेत. मात्र, आंघोळ करताना दोघेही बुडाले. काही वेळाने नदीवरील पुलाजवळ दीपालीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला. तो ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढला. त्यानंतर काही वेळात मंगरुळ चव्हाळा पोलिसांनी शिवाचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरिता नांदगाव खंडेश्वर येथे पाठविण्यात आले. रविवारी सायंकाळच्या सुमारास दोघांवर अंतिमसंस्कार करण्यात आले. मंगरुळ चव्हाळ्याचे ठाणेदार सुनील वायदंडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आगाशे, शिपाई राहूल देशमुख व अविनाश शिरोळे यांनी बचावकार्य केले.

Web Title: four dead in Purna River in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी