लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत ...
परतवाडा आणि अंजनगाव सुर्जी भागात याआधी हे बेडूक आढळले तरी ते मेळघाटामधील लाकडांसोबत, लाकडाच्या ढोलीतून तेथे आल्याचा दावा संशोधक तथा अमरावती स्थित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक गजानन वाघ यांनी केला. ...
१७ जून रोजी मंदिरातून दानपेटीतील पैसे व चांदीच्या पादुका गहाळ झाल्या. येवदा ठाण्यात याप्रकरणी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. स्थानिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान १६ जुलै रोजी गोकुल हरिदास उमाळे (३४, रा. येरंडगाव) याला अटक केली. त्याच्याकडून अ ...
पंचक्रोशीत शेंदूरजना घाट येथील पोळा बाजार प्रसिद्ध आहे. या पोळा बाजारात अवघ्या ३६ तासांत कोट्यवधींची उलाढाल होते. फर्निचरपासून गृहपयोगी, शेतीविषयक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. सर्वांत मोठी उलाढाल ही फर्निचर बजारात होत असते. सोफा, दिवाण, क ...
कोरोनाकाळात मिळत असलेले रेशनचे धान्य काही जणांकडून विकले जात आहे. यात धान्य तस्कराची चांदी झाली आहे. या गैरप्रकाराकडे स्थानिक पुरवठा विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे. अंजनगाव सुर्जी, परतवाडा व चांदूर ...
आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे घेता यावे, यासाठी ‘मिशन आकार’हा प्रकल्प राबविला जात आहे. ...
स्वॅब प्रकरणात सदर तरुणी धाडसाने पुढे आल्यानेच हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीसह तिचे कुटुंबीय व पोलिसांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या विकृताकडून आणखीही काही प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. पुरुषाची नजर ओळखण्याची महिलेला एक नैसर्गिक देण अस ...
संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या रेती तस्करांची प्रशासनात मिलीभगत असल्यामुळे एवढे निर्ढावले आहेत की, २५ खबऱ्यांची टोळी रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी आणि ५०-६० मजूर नदीचे पात्र खोदण्यासाठी वापरले जातात. पाच ते दहा ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताफा ही रेती वाहून न ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने स्थानिक नागरिकांसह गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांनासुद्धा त्याचा फटका बसला आहे. दोन वर्षांपासून जंगलातून जाणाऱ्या तालुका मुख्यालयासह गावखेड्यांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांच्या नूतनीकरण वजा र ...