शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अशासकीय प्रशासक मंडळाच्या हालचालींना वेग

By admin | Updated: August 1, 2014 00:03 IST

सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

अमरावती बाजार समिती : इच्छुक पुढारी लागले कामालाजितेंद्र दखने - अमरावतीसहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक पुढाऱ्यांनी आपआपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार 'लॉबींग' सुरु केली आहे. जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी सध्या अचलपूर, अमरावती आणि अंजनगाव सुर्जी या तीन कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासकीय प्रशासक कार्यरत आहेत. तर नांदगाव खंडेश्वर व तिवसा बाजार समीतीवर अशासकीय प्रशासक मंडळ कार्यरत आहे व वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, दर्यापूर आणि धारणी या सात बाजार समितींवर विद्यमान संचालक मंडळ कार्यभार सांभाळत आहेत. यापैकी दर्यापूर आणि वरुड बाजार समितीच्या संचालक मंडळाची येत्या आॅगस्ट महिन्याअखेर कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने या बाजार समित्यांवर शासकीय प्रशासक नियुक्त केलेजाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर, अमरावती, अंजनगाव सुर्जी या पाच बाजार समितींच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे १० एप्रिल २०१४ नंतर राज्य शासनाने या बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिन्यांपर्यंत पुढे ढकलल्यामुळे येथील प्रशासक हटवून अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी शासनस्तरावर राजकीय पुढाऱ्यांनी अशासकीय प्रशासक मंडळाची मांगणी रेटून धरली याची दखल घेत शासन स्तरावरुन जिल्हा निबंधकांना प्रस्ताव मागविण्यात आले. यामध्ये अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी या तीन बाजार समितींचा समावेश आहे. या समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ निवडीच्या हालचाली तेज होताच राजकीय गॉडफादर कडे जोरदार लॉबींग सुरु केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा निबंधकांनी संबंधीत तालुक्याचे सहायक निबंधक यांच्या मार्फत पडताळणी प्रस्ताव मागवून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती आहे. राजकीय हालचालींना वेग आल्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघाले आहे.