शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं तर नवलचं...! मेळघाटात शंभरावर बालमृत्यूच्या तक्रारीची सात वर्षांनंतर दखल

By गणेश वासनिक | Updated: June 17, 2025 13:12 IST

Amravati : राज्य मानवी हक्क आयोगाकडे १ जुलै रोजी होणार अंतिम सुनावणी, जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पत्र

अमरावती :मेळघाटात शंभरावर बालमृत्यूच्या संदर्भात २ ऑगस्ट २०१८ रोजी करण्यात आलेल्या तक्रारीची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने तब्बल सात वर्षांनंतर घेतली आहे. आता १ जुलै २०२५ रोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार असल्याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारीनंतर तब्बल सात वर्षे न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली, असेच म्हणावे लागेल.

एका वृत्तपत्रात ‘मेळघाटात शंभरावर बालमृत्यू’ या आशयाची बातमी ११ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झाली होती. या वृत्ताच्या आधारे भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बनसोड यांनी २ ऑगस्ट २०१८ रोजी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रारीद्वारे सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशा मागणी तक्रार दिली होती. या तक्रारीत प्रकाश बनसोड यांनी मेळघाटात आदिवासी, दलित समाजातील महिला आरोग्य सुविधाविना आणि बालके कुपाेषणाचे बळी ठरत आहे. शासन, प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ही बाब अत्यंत गंभीर असून मानवी हक्क अधिकार आयोगाशी संबंधित असल्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी, असे बनसोड यांनी तक्रारीत नमूद केले होते. मात्र, सात वर्षांनंतर राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांनी त्यांच्याकडील केस क्रमांक ५७५५/२०१८ हे प्रकरण सुनावणीस आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून अपर जिल्हा दंडाधिकारी अनिल भटकर यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अतुल भडांगे यांना सुनावणीस हजर राहण्याबाबत २६ मे रोजी पत्र पाठविले आहे.

मेळघाटात बालमृत्यू आटोक्यात आल्यानंतर सुनावणीजिल्हा प्रशासनाने जानेवारी २०२२ पासून मेळघाटमधील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी राबवलेल्या ‘मिशन मेळघाट २८’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे धारणी आणि चिखलदरा तालुक्यांतील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असून संस्थात्मक प्रसूतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे बालमृत्यू थांबले असून जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांना 'स्कॉच अवॉर्ड' देखील जाहीर झाला आहे. मेळघाटात बालमृत्यू आटोक्यात आल्यानंतर सुनावणी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावती