'महसूल'मधून अनुसूचित जमातींची ४६ पदे गायब; अधिसंख्य ८० तर, रिक्त केवळ ३४ पदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:56 IST2024-12-26T09:56:47+5:302024-12-26T09:56:55+5:30

महसूल विभागात गट 'क'ची एकूण मंजूर पदे १९ हजार ६१० आहे.

Out of which a total of 46 posts of Scheduled Tribes in Group-C category are missing in the Revenue Department | 'महसूल'मधून अनुसूचित जमातींची ४६ पदे गायब; अधिसंख्य ८० तर, रिक्त केवळ ३४ पदे

'महसूल'मधून अनुसूचित जमातींची ४६ पदे गायब; अधिसंख्य ८० तर, रिक्त केवळ ३४ पदे

अमरावती : राज्यातील महसूल विभागात तलाठी, अव्वल कारकून, मंडळाधिकारी, लिपिक या गट-क' संवर्गातील अनुसूचित जमातींची एकूण ४६ पदे गायब झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. 

महसूल विभागात गट 'क'ची एकूण मंजूर पदे १९ हजार ६१० आहे. यातील २ हजार १८४ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या १ हजार ६७० आहे. यापैकी अनुसूचित जमातींचे जातवैधता सादर करणाऱ्यांची संख्या १ हजार १३७ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांची संख्या ५३३ आहे. पूर्वीचा ५१४ पदांचा अनुशेष शिल्लक आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या ८० आहे. तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या ३४ दाखविण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ६ जुलै २०१७ची अंमलबजावणी राज्यात होत नसल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर असलेल्या गट 'क'ची १९ पदांची जाहिरात दिल्याचे नमूद आहे. यापैकी सन २०२० व २१ मध्ये १८ पदे भरल्याचे नमूद आहे.
 

Web Title: Out of which a total of 46 posts of Scheduled Tribes in Group-C category are missing in the Revenue Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.