शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

... अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, नवनीत राणांचा सरकारला इशारा

By महेश गलांडे | Updated: November 3, 2020 19:59 IST

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला

ठळक मुद्देअमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला

अमरावती - पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबद्दलची घोषणा केली. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तोकडी असून अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे झाले नसल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली. 

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले. यानंतर आता कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे आता कपाशीचे पीकसुद्धा वाया जात आहे. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी.’ अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच, ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही’ असा आक्रमक इशाराही नवनीत राणा यांनी सरकारला दिला आहे. 

राज्य सरकार म्हणतंय, केंद्राची मदत नाही

राज्य सरकारकडून शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत देण्यात आलेली आहे. मात्र केंद्राकडून अद्याप मदत आलेली नाही. निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले. त्यात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून केंद्राकडून मदत येणार होती. मात्र १०६५ कोटी रुपये अद्यापही बाकी आहे. ऑगस्टमध्ये पूर्व विदर्भात पूर आला. त्याचेही ८१४ कोटी रुपये केंद्राकडून यायचे आहेत. जीएसटीची भरपाई थकलेली आहे. असे एकूण ३८ हजार कोटी रुपयांचं येणं आहे. यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मरणपत्रं पाठवण्यात आली. मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.

असं असणार १० हजार कोटींचं पॅकेज-

कृषी, शेती घरासाठी- ५५०० कोटीरस्ते पूल- २६३५ कोटीग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा- १००० कोटीनगर विकास- ३०० कोटीमहावितरण उर्जा- २३९ कोटीजलसंपदा- १०२ कोटी

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRainपाऊसUddhav Thackerayउद्धव ठाकरे