समान मते मिळाली तरच सरपंचाला मताधिकार, ग्रामविकास विभागाने काढले परिपत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:50 IST2017-11-06T16:49:33+5:302017-11-06T16:50:12+5:30
अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे.

समान मते मिळाली तरच सरपंचाला मताधिकार, ग्रामविकास विभागाने काढले परिपत्रक
अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपसरपंचपद बहुमत असणा-यांना मिळणार, हे नक्की झाले आहे.
अमरावतीसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. अनेक गावांमध्ये सरपंच एका गटाचा, तर बहुतांश सदस्य दुस-या गटाचे विजयी झाले. त्यामुळे उपसरपंच निवडीत सरपंचाची भूमिका कशी राहील, असा प्रश्न सर्वांना पडला होता. याबाबत अनेकांनी ग्रामविकास खात्याला स्पष्टीकरण मागविले होते. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी १ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून उपसरपंच निवडीची नियमावली जारी केली. सरपंच हा पदसिद्ध सदस्य राहील, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
उपसरपंच निवडीबाबत सूचना
उपसरपंच निवडीच्या बैठकीचे अध्यक्ष हे सरपंच असतील. पद रिक्त असेल तर निवडणूक अधिकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतील. उपसरपंच निवडणुकीत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा सरपंचाला अधिकार राहील.