महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:12 AM2021-04-12T04:12:33+5:302021-04-12T04:12:33+5:30

फोटो - ११एएमपीएच११ कॅप्शन - ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेत श्रीकृष्ण बनसोड, डॉ. बबनराव बेलसरे, प्रभाकर वानखडे. अमरावती : स्थानिक फुले-आंबेडकर ...

Online International Conference on the Philosophy of Mahatma Phule | महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद

महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद

googlenewsNext

फोटो - ११एएमपीएच११

कॅप्शन - ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेत श्रीकृष्ण बनसोड, डॉ. बबनराव बेलसरे, प्रभाकर वानखडे.

अमरावती : स्थानिक फुले-आंबेडकर प्रबोधन मंचच्यावतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पार पडली.

महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार्रापणाने परिषेदेची सुरुवात झाली. दलितमित्र श्रीकृष्ण बनसोड यांनी दीपप्रज्वलन केले. ‘महात्मा फुलेंचा बुद्धिप्रामाण्यवाद व आजची व्यवस्था’ या विषयावर श्रीकृष्ण बनसोड यांनी उद्घाटनपर भाषण केले. महात्मा फुलेंनी निद्रिस्त समाजात नवी चेतना, नवा आत्मविश्वास निर्माण करून माणूस म्हणून जगण्याची हक्क मागणारी जाणीव त्यांनी निर्माण केली. आजच्या विषमताधिष्ठित व्यवस्थेतून बाहेर पडण्याची महात्मा फुलेंनी प्रबोधनाची चळवळ गतिशील करण्याची गरज बनसोड यांनी व्यक्त केली. प्रभाकर वानखडे यांनी प्रास्ताविकातून महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानावर विचार मांडताना ही ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद हे भारतातील पहिलेच आयोजन असल्याचे म्हटले. स्वागताध्यक्ष डॉ. बबनराव बेलसरे यांनी महात्मा फुलेंच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कार्यावर प्रकाश टाकला. आशुतोष सुरेश पाटील (सिडनी, ऑस्टेलिया) यांनी ‘फुलेंचा मानवमुक्तीचा लढा’, रामनारायण चौहान (दिल्ली) यांनी ‘फुलेंचे क्रांतिकार्य’, रामचरण माने (भोपाळ) यांनी ‘फुलेंचे मानवतावादी विचार’, प्रतिमा परदेशी (पुणे) यांनी ‘फुलेंचे स्त्रीमुक्तीची चळवळ’ यावर तसेच शालिग्राम भुसारी (अहमदाबाद) , अविनाश पाटील (धुळे) यांनीही अभ्यासपूर्ण विचार मांडले. अरुण बुंदले यांनी स्वागतगीत गायिले. वैशाली धाकूलकर यांनी अखंडाचे गायन केले. प्रवीण खांडवे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रभाकर वानखडे यांनी संचालन केले.

Web Title: Online International Conference on the Philosophy of Mahatma Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.