शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

ऑनलाईन फसवणूक : ना ओटीपी, ना स्कॅन; तरीही गमावले १.२७ लाख, व्यावसायिक महिलेला गंडा

By प्रदीप भाकरे | Updated: May 7, 2023 15:06 IST

Amravati Crime News:

- प्रदीप भाकरेअमरावती: ओटीपी शेअर न करता व क्युआर कोड स्कॅन न करताही एका महिलेच्या खात्यातून एकुण १ लाख २७ हजार २९७ रुपये डेबिट झाले. ८ ते ९ एप्रिलदरम्यान फसवणुकीची ही घटना घडली. याप्रकरणी एका महिला व्यावसायिकाच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी ६ मे रोजी दुपारी अज्ञाताविरूध्द फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. आपण कुणालाही ओटीपी शेअर केला नाही, कुठलाही ॲप डाऊनलोड केला नाही, क्युआर कोड स्कॅन केला नाही, किंवा कुण्या साईटला व्हिजिट दिली नाही, तरी देखील आपली रक्कम कपात कशी झाली, असा प्रश्न त्या महिलेने उपस्थित केला आहे.

यातील तक्रारकर्ती महिला ऑनलाईन कपडे व ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करतात. त्या संबंधांने त्यांना कुरिअर बॉईजचे कॉल येत असतात. ५ एप्रिल रोजी वेगवेगळ्या सहा मोबाईल क्रमांकावरून तुमचे कुरिअर डिॲक्टिव्हेट झाले असून, ते ॲक्टिव्हेट करण्यासाठी दिलेल्या लिंकवर पाच रूपये पाठविण्याचे सुचविले गेले. मात्र, त्या महिलेने त्या लिंकवर पैसे पाठविले नाही. दरम्यान ८ एप्रिल रोजी त्यांच्या दोन बॅंक खात्यातून अनुक्रमे २७ हजार ९०० रुपये, ९९ हजार ३९६ रुपये व ३ हजार रुपये डेबिट झाले. महिलेने तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर लगेचच ९ एप्रिल रोजी देखील त्यांच्या खात्यातून ९९९९ रुपये व १९५६ रुपये परस्पर कपात झाले. आपलीे पुन्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा सायबर पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यावेळी त्यांना खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. 

महिलेसमोर प्रश्नांची मालिकाओटीपी शेअर केला, केवायसीच्या नावावर बॅंक खात्याची माहिती शेअर केली. ओटीपी स्कॅन केला, तर फसवणूक होऊ शकते, तशा घटना घडल्या आहेत, हे तक्रारकत्या महिलेला ज्ञात होते. त्यामुळे त्यांनी कुठल्याही लिंकवर क्लिक केले नाही. किंवा पाच रुपये म्हणजे क्षुल्लक बाब, असा विचार करून ते देखील पाठविले नाहीत. कुठल्या संकेतस्थळावर त्या गेल्या नाहीत, असे असताना आपल्या खात्यातून १.२७ लाख रुपये कपात होणे, ही बाब त्यांच्यासाठी धक्कादायक ठरली आहे

टॅग्स :fraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम