एकतर्फी रस्ता; त्यातही अनधिकृत पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:48 IST2018-02-11T22:47:34+5:302018-02-11T22:48:44+5:30
सिमेंट रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी एकतर्फी मार्गावरून वाहतूक सुरू असताना बडनेरा रोड अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे.

एकतर्फी रस्ता; त्यातही अनधिकृत पार्किंग
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सिमेंट रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी एकतर्फी मार्गावरून वाहतूक सुरू असताना बडनेरा रोड अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे. दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ असल्यामुळे वाहनाचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत पार्कींगला वाहतूक शाखा व राजापेठ पोलिसांची मेहरबानीने असल्याचे चित्र आहे.
बाबा कॉर्नर ते नवाथेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम युध्द स्तरावर सुरू आहे. यासाठी बडनेरा मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरु आहे. या रस्त्यावर सर्वाधिक मंगल कार्यालय असल्यामुळे दररोजच्या लगीन घाईमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अपुऱ्या पार्किंगमुळे वरातीत येणारा प्रत्येक वाहनचालक रस्त्यावरच वाहने पार्क करीत आहे. २५ ते ३० फुटाच्या रस्त्यावर दहा फुट जागा गिळंकृत केल्यानंतर १५ ते २० फुटाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे.
या ठिकाणी वाहतुकीची कोंडी
दसरा मैदानासमोरच सिद्धार्थ मंगलम येथे पुरेशी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनचालक रस्त्यालगत वाहने उबी करीत असल्याने वाहतुकींची कोंडी निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सातुर्णाजवळील मार्गावरसुद्धा अनेक मंगल कार्यालये व लॉन असून तेथील परिस्थितीसुद्धा हाताबाहेर गेली आहे.