शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By गणेश वासनिक | Updated: October 25, 2022 17:03 IST

वाड्या,पोड, टोला, तांडा यांनाच बसणार फटका

अमरावती : राज्यात कमी लोकसंख्या असलेल्या दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या वाड्या, पोड, टोला आणि तांड्यावर २० पेक्षा कमी पटसंख्येच्या बहुतांश शाळा आहेत. या शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव आहे. त्यामुळे राज्यात २० विद्यार्थी पटांच्या शाळांची संख्या १४ हजार ९८५ असून त्या बंद होण्याची भिती आहे. या शाळांमधील जवळपास दीड लाख विद्यार्थीशिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने ६७ हजार ७५५ रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव सादर केला. पण शिक्षण संचालनालयाने २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागविली आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा शासनाचा इरादा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. केंद्र व राज्य शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा व नियम करुन शिक्षणाची हमी दिलेली आहे. याचे सरकार नक्कीच उल्लंघन करीत आहे. नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचा प्रयत्नही केला तरी जाण्या-येण्याचा प्रश्न आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही दुर्गम व डोंगराळ भागातील वाड्या, पोड, टोला व तांड्यावर पक्का रस्ता पोहोचलेला नाही. त्यामुळे वाहनेही धावत नाही. अशा विचित्र व विक्षिप्त परिस्थितीत शाळा बंद झाल्यास विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जाईल आणि त्यांचे शिक्षण थांबेल, यात दुमत नाही.

- तर शाळा बंदचा फटका गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांनाच

शाळा विद्यार्थ्यांसाठी त्याच्या घरी, विटभट्टीवर, साखर कारखान्यावर त्याच्या मागे धावत होती. आज मात्र विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेच्या मागे धावत असताना शाळा मात्र त्यांच्यापासून दूर जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे होऊ नये. गरिबांचे शिक्षण वाचविण्यासाठी २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे. 

अशी आहे सहा विभागात २० पटांच्या शाळांची संख्या१) अमरावती - १२२८२) नागपूर - २३९९३) कोकण - ४३८०४) नाशिक - १४९४५) पुणे - ३४३५६) औरंगाबाद - २०४९                  २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनातून केली आहे. या शाळा बंद करणे म्हणजे गरीब, आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणे आहे. शिक्षण हक्क कायद्याला छेद देण्याचा निर्णय आहे. याविरूद्ध लढा उभारला जाईल. 

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम. महाराष्ट्र

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीSchoolशाळा