गुंतवणुकीच्या नावाखाली दीड कोटींचा गंडा, बिल्डरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 18:03 IST2026-02-15T18:03:08+5:302026-02-15T18:03:20+5:30
भागीदारी, फ्लॅट देण्याची बतावणी!

गुंतवणुकीच्या नावाखाली दीड कोटींचा गंडा, बिल्डरवर गुन्हा दाखल
प्रदीप भाकरे, अमरावती: शहरात गुंतवणूक आणि भागीदारीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या एका मोठ्या माशाचा पर्दाफाश झाला आहे. येथील फिर्यादी अनिता (५२, रा. मुधोळकर पेठ) यांना तब्बल १ कोटी ५१ लाख रुपयांना लुबाडल्याप्रकरणी आता आरोपी श्रीकांत हरगोविंद कलंत्री (वय ४० वर्षे, रा. स्काय प्लाय, १० वा माळा, नवजीवन हॉस्पिटलजवळ, कॅम्प, अमरावती) याच्याविरुद्ध १४ फेब्रुवारी रोजी रात्री राजापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०१८ पासून फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ती आर्थिक फसवणुकीची मालिका चालली. विशेष म्हणजे यात, फसवणुकीसह महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (ठेवीदारांचे संरक्षण) ‘एमपीआयडी’ कायद्याचे कलमदेखील समाविष्ट करण्यात आले आहे.