बाळासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:30 IST2019-04-21T01:29:11+5:302019-04-21T01:30:03+5:30

संताप । दर्यापूरमध्ये अकोल्याच्या व्यक्तीस चपलांनी मारले लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ...

Offensive post about Balasaheb Ambedkar | बाळासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट

बाळासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट

ठळक मुद्देसंताप । दर्यापूरमध्ये अकोल्याच्या व्यक्तीस चपलांनी मारले



संताप । दर्यापूरमध्ये अकोल्याच्या व्यक्तीस चपलांनी मारले
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ती कथित पोस्ट टाकणाऱ्या अकोला येथील संबंधित व्यक्तीला शनिवारी दर्यापूर येथे चपला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी भाई रजनीकांत नामक व्यक्तीने व्हॉट्सअपवर बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह संदेश पोस्ट केला. भाई रजनीकांत हे शनिवारी दर्यापूर येथे काही कामानिमित्त आले असता स्थानिक भाजपा नगरसेवक अ‍ॅड. संतोष कोल्हे यांनी त्यांना बसस्टँडसमोरील एका हॉटेलमध्ये गाठले. सकाळी आठच्या सुमारास दोन ते तीन जणांनी मिळून रजनीकांत यांना जोडे-चपलांनी मारहाण केली. त्यांना जाब विचारला. या मारहाणीचा व्हिडीओपसुद्धा व्हायरल झाला आहे.

Web Title: Offensive post about Balasaheb Ambedkar