आक्षेपार्ह मजकुराने बडनेऱ्यात तणाव

By Admin | Updated: July 14, 2014 23:41 IST2014-07-14T23:41:44+5:302014-07-14T23:41:44+5:30

विशिष्ट समुदायाच्या भावना दुखविणारा आक्षेपार्ह मजकूर लिहून अश्लील छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पाठविल्याने सोमवारी बडनेऱ्यात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त नागरिकांनी जुनी वस्ती

Objectionable text | आक्षेपार्ह मजकुराने बडनेऱ्यात तणाव

आक्षेपार्ह मजकुराने बडनेऱ्यात तणाव

पोलीस ठाण्याला घेराव : अलमासनगर गेटसमोर टायरची जाळपोळ
बडनेरा : विशिष्ट समुदायाच्या भावना दुखविणारा आक्षेपार्ह मजकूर लिहून अश्लील छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पाठविल्याने सोमवारी बडनेऱ्यात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त नागरिकांनी जुनी वस्ती येथील अलमासनगर गेटसमोर टायरची जाळपोळ करुन रोष व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी बडनेरा पोलीस ठाण्याला घेराव करुन आरोपीला अटक करण्याची मागणी रेटून धरली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला तत्काळ अटक केल्याने तणाव निवळला.
अलमासनगरातील एका युवकाच्या भ्रमणध्वनीवर सोमवारी पवननगरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे आक्षेपार्ह मजकुर लिहून अश्लिल छायाचित्र पाठविले होते.
बडनेऱ्यात तणाव; आरोपीला अटक
अश्लील छायाचित्र पाहून अलमास नगरात शेकडो नागरिकांची गर्दी जमली. त्यांनी तेथे टायरची जळपोळ केली. घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच सहायक पोलीस आयुक्त जी. एम. साखरकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जाळपोळ प्रकरणी युवकांना ताब्यात घेतल्याने ठाण्यात शेकडोंचा जमाव धडकला. त्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी रेटून धरली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Objectionable text

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.