विद्यापीठात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, आज सामूहिक चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:00+5:302021-02-23T04:20:00+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. विशेषत: परीक्षा ...

The number of corona sufferers at the university increased, the collective test today | विद्यापीठात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, आज सामूहिक चाचणी

विद्यापीठात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, आज सामूहिक चाचणी

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. विशेषत: परीक्षा व मूल्यांकन, लेखा विभागात अधिक संख्येने पॉझिटिव्ह आढळून आल्याने विद्यापीठ कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ तर होणार नाही ना, अशी चिंता बळावली आहे.

कोरोनाचा संसर्ग १ फेब्रुवारीपासून वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने दरदिवशी नवा उच्चांक गाठला जात आहे. एप्रिल २०२० पासून विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र, नवीन वर्षातच विद्यापीठात अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने संक्रमित आढळून येत आहेत. गत आठवड्यात परीक्षा व मू्ल्यांकन विभाग, वित्त व लेखा विभाग आणि प्रशासकीय इमारतीत कोरोनाग्रस्त आढळून येण्याचा वेग वाढला आहे. हल्ली विद्यापीठात परीक्षा आणि महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाची प्रक्रिया राबविली जात असल्याने अवागमन वाढले आहे. काही विभागांत प्रमुख अधिकारी संक्रमित आढळून आल्याने त्या विभागातील कर्मचारी चिंतातुर झाले आहेत. विद्यापीठात अधिकारी, कर्मचारी त्रिसूत्रीचे पालन करीत असले तरी बाहेरून ये-जा करणाऱ्यांपासून धोका वाढल्याचे वास्तव आहे. मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना विद्यापीठ प्रशासनाला कराव्या लागतील, तेव्हा कोराेना संसर्ग राेखता येईल, असे दिसून येते.

---------------------

आज सामूहिक कोरोना चाचणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना संक्रमित आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, २३ फेब्रुवारी रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांची सामूहिक कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेची चमू विद्यापीठात येऊन अँटिजन, आरटी-पीसीआर चाचणी करणार असल्याची माहिती परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.

Web Title: The number of corona sufferers at the university increased, the collective test today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.