NRC, CAA, 'Stop or Die' strategies against NPR: Abu Azmi | एनआरसी, सीएए, एनपीआरविरुद्ध‘करो या मरो ’रणनीती:अबू आझमी
एनआरसी, सीएए, एनपीआरविरुद्ध‘करो या मरो ’रणनीती:अबू आझमी

अमरावती : सरकार झुकेपर्यंत एनआरसी, सीएए, एनपीआर विरोधात आंदोलन सुरू राहील, असह्योग आंदोलन चालवू, सरकार मानले नाही तर, पुढे 'करो या मरो' ची रणनीती राहील, असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी बुधवारी अमरावतीमधील सत्याग्रह आंदोलनाच्या भेटीदरम्यान दिला.  

एनआरसी, सीएए, एनपीआरचा निर्णय रद्द करण्याबाबत सरकार मानत नसेल तर इंग्रजावेळी झालेल्या आंदोलनासारखे आंदोलने सुरू करू, देशाचा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविला. मात्र, आजच्या सरकारने मनमानी कारभार चालविला आहे. धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. संविधान वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दिवस संपत आले आहे, ते पाकिस्तानसोबत खेळ खेळत आहे. उठल्या बसल्या त्यांना पाकिस्तानाचीच आठवण येते, असा आरोप अबू आझमी यांनी केला.

अमित शहा गुंड होते. त्यांना तडीपारसुद्धा केले होते. असले गुंडप्रवृत्तीची नेते सरकार चालवीत आहे. त्यांनासुद्धा लवकरच खुर्चीच्या खाली उतरवू, असा इशारा अबू आझमी यांनी दिला. अमरावतीच्या इर्विन चौकात मौलाना आझाद सोसायटीच्या सत्याग्रह आंदोलनाच्या भेटीदरम्यान अबू आझमी यांनी माध्यमांसमोर सरकारवर हे गंभीर आरोप केले.

Web Title: NRC, CAA, 'Stop or Die' strategies against NPR: Abu Azmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.