शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

बंदीजनांनी साधला आप्तांसोबत ‘व्हिडीओ कॉलिंग’ने संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:25 AM

येथील खुले कारागृहातील बंद्यांनी शुक्रवारी आपल्या आप्तेष्टासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये बंद्यांना रक्ताच्याच नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोगअमरावतीच्या खुल्या कारागृहात शुभारंभ

गणेश वासनिक ।आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील खुले कारागृहातील बंद्यांनी शुक्रवारी आपल्या आप्तेष्टासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये बंद्यांना रक्ताच्याच नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे.अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा यांच्या संकल्पनेतून राज्यात खुल्या कारागृहातील पुरुष-महिला बंद्यांसाठी नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाली आहे. या सुविधेला अमरावती खुले कारागृहातून शुभारंभ झाला तेव्हा श्रीकृष्ण पाचगडे व राजाभाऊ सवणे या दोन बंद्यांनी मुलांसोबत व्हिडीओ कॉलिंगने संवाद साधून गावाकडील ख्यालीखुशाली जाणून घेतली. आई, नातवंड, भाऊ कसे आहेत, हे विचारताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.कारागृहातील बंदींना नातेवाइकांना भेटताना कठीण नियमावली पार करावी लागते. अशातच नातेवाईकदेखील हलाखीची परिस्थिती, लांबचा प्रवास यामुळे कारागृहापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर खुले कारागृहातील बंदीजनांना व्हिडीओ कॉलिंग ही सुविधेचा प्रारंभ केला. या अभिनव उपक्रमाबाबत कैद्यांनी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांचे मनस्वी आभार मानले.शुभारंभाप्रसंगी मध्यवर्ती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, तुरूंगाधिकारी मोहन चव्हाण, वरिष्ठ तुरुंगाधकारी ए.आर. जाधव, पी.एस. भुसारे, बी.एस. सदांशिव, आर.एन. ठाकरे आदी उपस्थित होते.खुले कारागृहातील कैद्यांसोबत रक्ताची नाती असलेल्यांनाच व्हिडीओ कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येईल. प्रशासनाकडे नियमानुसार त्याची नोंद असेल. हा सर्व प्रकार आॅनलाईन राहील. वरिष्ठांना क्षणात माहिती मिळेल.- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया