शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आता सहायक वनसंरक्षकांना कार्यालयप्रमुखांचा दर्जा

By admin | Updated: September 17, 2014 23:29 IST

वनविभागात केवळ नाममात्र पद असलेल्या सहायक वनसंरक्षकांना आता ‘कार्यालय प्रमुख’ हा नवा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना उपवनसंरक्षकाकडे फाईल

पापळ : वनविभागात केवळ नाममात्र पद असलेल्या सहायक वनसंरक्षकांना आता ‘कार्यालय प्रमुख’ हा नवा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना उपवनसंरक्षकाकडे फाईल पाठविताना सहायक वनसंरक्षकांच्या मार्फतच पाठवावी लागेल. सहायक वनसंरक्षकांना अधिकार बहाल करण्यात आल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बराच अधिकारावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने ३ सप्टेंबर २०१४ रोजी महसूल विभागाच्या धर्तीवर वनविभागात उपवनविभाग तसेच त्यांचे कार्यक्षेत्र व मुख्यालय निश्चित करण्याबाबत व सहायक वनसंरक्षकांना ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय काढला. या नव्या निर्णयामुळे नाममात्र असलेल्या सहायक वनसंरक्षकांना अधिकार बहाल करण्यात आले आहे. वनविभागात कागदोपत्री अधिकारी पद म्हणजे सहायक वनसंरक्षक हे होते. मात्र आता वनांवर लक्ष ठेवण्यासह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कामाकाजावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. वन विभागात प्रादेशिक विभाग स्तरावर तसेच वन्यजीव विभाग स्तरावर भारतीय वन सेवेचे, महाराष्ट्र वन सेवेचे अधिकारी उप वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अधिनस्त महाराष्ट्र वनसेवेचे सहायक वनसंरक्षक कार्यरत आहेत. सहाय्यक वनसंरक्ष हे वन विभागात वर्ग- १ चे उपविभागीय स्तरावरील अधिकारी आहेत. सहाय्यक वनसंरक्षकांना वन विभागात क्षुल्लक अधिकार असल्याने त्यांची काहीच चलती न्हवती. मात्र शासनच्या नव्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षकपद हे इतर विभागाशी समन्वय साधणे आणि उपवन संरक्षकांना तांत्रिक व धोरणात्मक कामकाजाकरिता वेळ मिळावा, यासाठी वन विभागात उपविभाग हा घटक निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहायक वनसंरक्षकांना अधिकार बहाल करताना शासनाने १४३ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना या पदावर बढतीसुद्धा दिली आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बढतीसोबत अधिकारही मिळाल्याने वन अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या सहायक वनसंरक्षकांना शासनाच्या नव्याने दिलासा मिळाला.