शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

आता व्याघ्र गणनेसाठी जीपीएस एम- ट्रॅक, जानेवारीत दोन टप्प्यांत होणार गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 17:34 IST

अमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे.

गणेश वासनिकअमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. पायांचे ठसे, ट्रॅपिंग कॅमेरे आदी पारंपरिक पद्धतीदेखील व्याघ्र गणनेची वैशिष्ट्ये राहणार आहेत.व्याघ्र गणना राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य, नवेगाव बांध, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य आणि सह्याद्री अभयारण्यात होणार आहे. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि जंगल क्षेत्रात व्याघ्र गणना केली जाईल. जीपीएस एक-ट्रॅक ही प्रणाली पहिल्यांदाच वापरली जात असल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पात अधिका-यांच्या एका तुकडीला प्रशिक्षण देण्यात आले. ही तुकडी त्यांच्या क्षेत्रातील अधिकारी, कर्मचा-यांना व्याघ्र गणनेबाबत प्रशिक्षण देणार आहे.राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. यापूर्वी २०१४ मध्ये व्याघ्र गणना झाली. आता त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये होत आहे. दोन टप्प्यांत गणना होणार असून, पहिल्या टप्प्यात ट्रॅपिंग कॅमेरे, तर दुस-या टप्प्यांत पाच दिवस जीपीएस एम-ट्रॅकद्वारा गणना केली जाईल. यात दरदिवशी वनरक्षकांना ३०, तर वनपालांना २० किमी पायी प्रवास करणे अनिवार्य केले आहे. वाघांच्या पायाचे ठसे, विष्ठा, शिकारीचे प्रकार आदींचा अभ्यास करून माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर राज्यनिहाय गणनेची माहिती दिल्ली येथील एनटीसीएकडे पाठविली जाईल.व्याघ्र गणनेत वनविभाग, वन्यजीव, एनटीसीए, डब्ल्यूआयआय, एनजीओंचा सहभाग राहील. जीपीएस एम- ट्रॅक हे अत्याधुनिक यंत्र वापरासाठीचे प्रशिक्षण पेंच व्याघ्र प्रकल्पात ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान देण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गंत अधिकारी, कर्मचा-यांना १८, १९, २० डिसेंबर रोजी गणनेबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या व्याघ्र गणनेची तारीख अद्यापही निश्चित झाली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.जीपीएस एम- ट्रॅकची वैशिष्ट्येजंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनकर्मचा-यांना जंगलात पायी गस्त घालण्याची सक्ती आहे. वनरक्षक ३०, तर वनपालांना २० किमी अंतर दरदिवसाला कापावे लागते. जीपीएस एम- ट्रॅक अ‍ॅप्लिकेशनमुळे कोणी, किती अंतर गाठले, हे क्षणात कळते. हीच प्रणाली व्याघ्र गणनेसाठी वापरली जाणार आहे.व्याघ्र गणनेसाठी पहिल्यांदाच जीपीएस एम- ट्रॅक अ‍ॅप्लिकेशन वापरले जात आहे. त्याकरिता अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गणनेसाठी पारंपरिक व अत्याधुनिक यंत्रणेची जोड दिली आहे.- निशांत वर्मासंचालक, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, दिल्ली.

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती