शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

आता जिल्हाधिका-यांकडे शिष्यवृत्तीचे नियंत्रण, अमरावतीत १.६० लाख शिष्यवृत्ती अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 18:55 IST

मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. परिणामी अमरावती विभागात १ लाख ९२ हजार ८१८ प्राप्त अर्जांपैकी १ लाख ६० हजार ३४१ शिष्यवृत्तीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

अमरावती - मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. परिणामी अमरावती विभागात १ लाख ९२ हजार ८१८ प्राप्त अर्जांपैकी १ लाख ६० हजार ३४१ शिष्यवृत्तीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना गोंधळातून सुटका मिळावी, यासाठी आता जिल्हाधिकाºयांकडे शिष्यवृत्तीचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे.अगोदर आॅफलाईन त्यानंतर आता आॅनलाईन असा प्रवास करणा-या शिष्यवृत्ती योजनेचा गाडा अद्यापही रूळावर आलेला नाही. अनुसूचित जाती/ जमातीच्या व अन्य घटकातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा पुरता बोझवारा उडाला आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज मान्यतेअभावी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे ७५ ते ८० टक्के प्रलंबित आहे. शैक्षणिक सत्र २०१८-२०१९ या वर्षातील ही आकडेवारी असून, शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाडीबीटीद्वारे विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतरही वेळेपूर्वी त्याला मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी व एससी संवर्गातून श्षियवृत्तीसाठी आलेल्या अर्जावर दखल घेण्यात येत नाही. शिष्यवृत्तीतील गोंधळ दूर करण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांवर सोपविली आहे. आठ दिवसांत याबाबतचा सकारात्मक निर्णय घेऊन महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात जिल्हाधिकारी समन्वय साधतील, अशी तयारी करण्यात आली आहे.       अमरावती विभागात ३२ हजार ४७७ अर्ज मंजूरअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ओबीसी, एससी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातून १,९२,८१८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सामाजिक न्याय विभागाने ३२,४७७ अर्ज मंजूर केले. यात अमरावती जिल्हा ४१,०९१, अकोला-१४,७३०, यवतमाळ-२०,९७४, बुलडाणा-२१,२५२, तर वाशीम जिल्ह्यात ११,५०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी सामाजिक न्याय विभागाने अमरावती जिल्ह्यात ६३८४, अकोला ६३७९, यवतमाळ १०३०८, बुलडाणा ६३४९ तर वाशिम जिल्ह्यातून ३०५७ एवढे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर केले आहे.      आॅटो मंजुरीशिवाय गुंता सुटणे अशक्यशिष्यवृत्तीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, मराठा, ईबीसी प्रवर्ग, अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. मात्र, शिष्यवृत्ती अर्ज मान्यतेसाठी आॅटो मंजुरात प्रणाली लागू केल्याशिवाय गुंता सुटणार नाही, असे तज्ञ्जाचे मत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर ते ट्रॅकरद्वारे नव्या सॉफ्टवेअरमध्ये मंजूर करणे, प्राचार्यांनी त्यास मंजुरी प्रदान करावी, मोबाइल किंवा केवायसीद्वारे कन्फर्म करणे आणि त्यानंतर महाविद्यालयांवर सर्वस्वी जबाबदारी टाकणे, अशी प्रक्रिया राबविल्यास यातील बहुतांश प्रश्न सुटतील.      शिष्यवृत्तीच्या आढाव्यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकाºयांनी बैठक घेतली. महाविद्यालयांकडून अर्ज वेळेत येत नसल्याने ते कार्यालयाकडून छाननी करण्यास विलंब होतो. मात्र, आता जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार संस्था चालकांना सूचना देण्यात आल्या आहे. येत्या आठ दिवसांत प्रलंबित अर्ज निकाली काढले जातील.    - विजय साळवे, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अमरावती

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAmravatiअमरावती