शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

-आता अनधिकृत मोबाईल टॉवर कंपन्यांविरुद्ध फौजदारी

By admin | Updated: February 28, 2015 00:33 IST

शहरात विनापरवानगीने उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवर कंपन्यांविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी घेतला.

अमरावती : शहरात विनापरवानगीने उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवर कंपन्यांविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी घेतला. या निर्णयाची कारवाई झाली नाही तर सहायक संचालक नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे निर्देश देण्यात आले.स्थायी समितीची बैठक सभापती मिलिंद बांबल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विलास इंगोले, प्रवीण हरमकर, जयश्री मोरे, वंदना हरणे, साा्नका महल्ले, ड१रज हिवसे, अंबादास जावरे, कांचन डेंडुले, कुसूम साहू, कांचन उपाध्याय, राजेंद्र तायडे, छाया अंबाडकर, अजय गोंडाणे, योजना रेवस्कर आदी उपस्थित होते. बैठकीत अनधिकृत मोबाईल टॉवर कंपन्याची मुस्कटदाबी करण्यासाठी कठोर उपयायोजना करण्याचे ठरविण्यात आले. त्याअनुषंगाने शहरात असलेल्या १५२ मोबाईल टॉवर कंपन्यापैकी १२७ कंपन्यांविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचा निर्णय स्थायी समितीत सदस्यांच्या मागणीनुसार घेतला. तसेच दोन दिवसांपूर्वी रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांनी विलासनगरातील अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्याचे आंदोलन केले. मात्र कंपनीच्या तक्रारीनुसार दंदे यांच्यावर झालेली फौजदारी कारवाई मागे घेण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत मोबाईल कंपन्या टॉवर उभारतात कसे? हा संशोधनाचा विषय असून यात अधिकारी, अभियंते सामील असल्याचा आरोप देखील सदस्यांनी केला. मोबाईल टॉवर कंपन्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी प्रशासन का पुढाकार घेत नाही, ही बाब चिंतनीय असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. अनधिकृत मोबाईल टॉवर किती? हे शोधण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. (प्रतिनिधी )