शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

आता विद्यापीठ प्रयोगशाळेत दरदिवशी १७०० नमुने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:24 AM

अमरावती : कोरोना चाचणीचे अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, त्यामुळे ...

अमरावती : कोरोना चाचणीचे अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, त्यामुळे या प्रयोगशाळेत आता दिवसाला १७०० अहवाल मिळणार आहेत. आरोग्य यंत्रणेला अहवाल वेळेत कळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी प्रयोगशाळेची पाहणी व तज्ज्ञांशी चर्चा केली.

कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी स्थानिक पातळीवर अहवाल देणारी प्रयोगशाळा असावी, म्हणून १० महिन्यांपूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोविड-१९ विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी पाठपुरावा करून निधी मिळवून दिला. सुरुवातीच्या काळात या प्रयोगशाळेत दिवसाला १०० नमुने तपासले जात होते. मात्र, साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही क्षमतावाढ करून हजारपर्यंत नेण्यात आली. दरम्यान, पीडीएमसी रुग्णालयातही चाचण्यांची सुविधा झाली. अहवाल तत्काळ मिळून रूग्णांना वेळेत उपचार मिळवून शक्य झाले. या कामाला आणखी गती मिळावी म्हणून आता विद्यापीठात नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती नवाल यांनी दिली.

------------------

सॉफ्टवेअरही विकसित- प्रशांत ठाकरे

लॅबकडून आरोग्य यंत्रणेला वेळेत अहवाल मिळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याचा युझर आयडी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे लॅबकडे चाचणीच्या निष्कर्षाची नोंद झाल्यावर तत्काळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या दोन्ही कार्यालयांना ऑनलाईन माहिती कळणार आहे. त्यामुळे रुग्णांना माहिती कळविणे, उपचार आदी कामे ही दोन्ही कार्यालये गतीने करू शकतील, असे ‘कोविड-१९ मॉलेक्युलर डायग्नोस्टिक लॅब’चे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.

-------------------

निष्कर्ष लवकर कळतील- सुधीर शेंडे

आरटीपीसीआर चाचण्या करणारी ‘ऑटोमॅटिक एक्स्ट्रॅक्टर’सह अद्ययावत यंत्रणा दोन दिवसांपूर्वी कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे लॅबची नमुने तपासणी क्षमता प्रतिदिवस १७०० पर्यंत वाढली आहे. नमुने आल्यापासून ते निष्कर्ष हाती येईपर्यंतच्या कालावधीतही यामुळे घट होणार आहे. त्यामुळे जलदगतीने निष्कर्ष हाती येतील व पुढील उपायांना चालना मिळेल, असे लॅबमधील तज्ज्ञ सुधीर शेंडे यांनी सांगितले.

----------------

लॅबमध्ये चार पाळीत काम

विद्यापीठ लॅबमध्ये चार कक्षात काम चालते. सलग टेस्टिंगकरिता विविध पथके कार्यरत असून, सुरक्षिततेचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. लॅबमधील कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक काम दक्षतापूर्वक केले जाते. गत १० महिन्यांपासून हे काम अविरतपणे सुरू असल्याची माहिती तंत्रज्ञ अपर्णा जाधव व सचिन अवचार यांनी दिली.