आॅनलाईन लोकमतअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व उपवनसरंक्षक यांच्या कार्यालय परिसरात पत्ते खेळणे त्या वाहनचालकांना महागात पडणार आहे. वनविभागाच्या कार्यालयात पत्ते खेळणाऱ्या त्या वाहनाचालकांचे छायाचित्र 'लोकमत'ने लोकदरबारी मांडताच प्रचंड खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत क्षेत्र संचालक रेड्डी त्या वाहनचालकांना नोटीस बजावणार असून त्यासंबंधाने संबंधित वनक्षेत्र अधिकारी कारवाई करणार आहे.वनविभागाचे वाहनचालक दिवसरात्र वनसंवर्धनासह वन्यजीवांच्या रक्षणासाठी वाहन चालवून कर्तव्य बजावतात. वनविभागाच्या शिस्तबद्ध कारभारात हे वाहनचालक कर्तव्य बजावतात. मात्र, वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयात वाहनचालक बेशिस्त राहून चक्क टाईमपाससाठी पत्ते खेळत असल्याचे 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या छायाचित्रातून उघड झाले. जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातून अमरावती कार्यालयात दाखल झालेले हे वाहनचालक वाहनात जीपीएस प्रणाली बसविण्यासाठी आले होते. मात्र, फावल्या वेळात ते चक्क पत्त्यांचा खेळ खेळत बसले होते. हा प्रकार किती गंभीर स्वरुपाचा ठरू शकतो, याची कल्पनाही त्या वनकर्मचाऱ्यांना नव्हती. इतक्या बिनधास्तपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरातच त्यांनी पत्त्यांचे डाव सुरू ठेवले होते. त्यामुळे हे वाहनचालक जंगल सरंक्षणासाठी कर्तव्य बजावतात की, केवळ टाईमपास करतात, हे त्यांच्या व्यवहारावरून दिसून येत होते. हे 'लोकमत'ने छायाचित्रातून वास्तव उघड केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत त्यांना नोटीस बजावण्याचे फर्मान सोडले आहे.
‘त्या’ वाहनचालकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:28 IST
आॅनलाईन लोकमतअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व उपवनसरंक्षक यांच्या कार्यालय परिसरात पत्ते खेळणे त्या वाहनचालकांना महागात पडणार आहे. वनविभागाच्या कार्यालयात पत्ते खेळणाऱ्या त्या वाहनाचालकांचे छायाचित्र 'लोकमत'ने लोकदरबारी मांडताच प्रचंड खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत क्षेत्र संचालक रेड्डी त्या वाहनचालकांना नोटीस बजावणार असून त्यासंबंधाने संबंधित वनक्षेत्र अधिकारी कारवाई करणार आहे.वनविभागाचे वाहनचालक ...
‘त्या’ वाहनचालकांना नोटीस
ठळक मुद्देक्षेत्र संचालकांची माहिती : टाईमपास पडले महागात