शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयास जप्तीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:00 AM

अमरावती शहरातील १.४२ लाख मालमत्तांचा ४३.४३ कोटींचा कर महापालिकेला मिळतो. त्यावरच महापालिकेचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र, थकबाकीदार शासकीय विभाग, कार्यालये, निवासस्थाने हा वसुलीमध्ये अडसर बनला आहे. त्यामुळे या मोठ्या आस्थापनांना आता जप्तीच्या नोटीस बजावण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेचा बडगा । शासकीय विभागांकडे अडीच कोटींचा मालमत्ता कर थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयांसह अनेक कार्यालयांकडे अडीच कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महापालिकेने आता बडगा उगारत जप्तीच्या नोटीस बजावणे सुरू करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपायला एक महिना अवधी असताना १७ कोटींच्या थकबाकीपैकी अधिकाधिक वसुली करण्यासाठी महापालिकेचा करवसुली विभाग कामाला लागला आहे.अमरावती शहरातील १.४२ लाख मालमत्तांचा ४३.४३ कोटींचा कर महापालिकेला मिळतो. त्यावरच महापालिकेचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र, थकबाकीदार शासकीय विभाग, कार्यालये, निवासस्थाने हा वसुलीमध्ये अडसर बनला आहे. त्यामुळे या मोठ्या आस्थापनांना आता जप्तीच्या नोटीस बजावण्यात येत आहेत. झोन क्रमांक १ मध्ये सद्यस्थितीत ७३ लाख १४ हजार ७३८ रुपयांची वसुली बाकी आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय १,४५,७०२, नियोजन भवन ५,६६,५३७, विभागीय आयुक्त बंगला १६,०७४, अप्पर जिल्हाधिकारी बंगला ११,४२०, बचत भवन ३२,५१७, तालुका फळरोपवाटिका ६४,१३०, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय २९,८८७, कार्यकारी अभियंता (आदिवासी विभाग) ३२,७५२, बी अँड सी वर्कशॉप १,५७,०००, टेलिकॉम कॉलनी ५,७७,५५७, बीएसएनएल मोबाइल टॉवर १,१७,०८८, पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालय १,१५,३५९, पशुधन विकास अधिकारी १२,०६४, महवितरण उपकेंद्र ९,९४,२५४, महावितरण नवसारी उपकेंद्र ८,३५,४५२, राजेंद्र काकडे (मोबाइल टॉवर) २,०२,२६९, करिअर मार्गदर्शक केंद्र १३,२८७, तालुका निरीक्षक भूमिअभिलेख ८९,३३४, व १,२१,२०७, शासकीय तंत्रनिकेतन ६२,३१८, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय १,००,९८४, जिल्हा स्त्री रुग्णालय हिवताप १२,०३,१५४, कुष्ठरोग १२,०४,३९८, जिल्हा क्रीडा अधिकारी २२,१०८ व ३,४३,९०९ रुपये असे बडे थकबाकीदार आहेत. झोन क्रमांक ५ मध्ये नागपुरी गेट पोलीस ठाणे व निवासस्थाने २३,८२,७६६, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन २१,८०५ व खोलापूरी गेट पोलीस स्टेशन, जुनी कोतवाली भाजीबाजार ६६,७७८ रुपये अशी कर थकबाकी आहे.बीएसएनएलकडे १० लाखांची थकबाकीझोन २ मध्ये १.४५ कोटींची थकबाकी आहे. यामध्ये बीएसनएलकडे ५,४५,६६४, व ५,००,२७८, भातकुली तहसील कार्यालय २,४५,५८०, राज्य माहिती आयुक्त कार्यालय ६५,५९५, समाजकल्याण विभाग १,०१,७८२, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह १,१७,०३७, जिल्हा सत्र न्यायालय (नवीन) १८,००,७९१, विभागीय आयुक्त कार्यालय ४८,२८,४३८, शहर पोलीस निवास १२,०७,७८७, सिटी कोतवाली २,७८,५३९, महाराष्ट्र शासन (महसूल विभाग) १,३६,३४६, तहसील कार्यालयाकडे ३,५३,१६० रुपयांची थकबाकी आहे.१७ कोटींची वसुली बाकीमहापालिका हद्दीत ४३,४३,५०,०२० कोटींची करमागणी आहे. या तुलनेत सद्यस्थितीत २६,४३,१९,८९६ कोटींची वसुली करण्यात आली व १७ कोटींची वसुली बाकी आहे. झोन १ मध्ये ३,६५,५०,७१७, झोन २ मध्ये ५,३९,५१, ५५२, झोन ३ मध्ये १,४७,५४,०१९, झोन ४ मध्ये ४,९३,१४,१४७ व झोन क्रमांक ५ मध्ये १,५४,५९,८६९ रुपयांची वसुली बाकी आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाTaxकर