शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे पुनर्गठन नव्हे, ही तर मुदतवाढ

By admin | Updated: May 18, 2014 23:16 IST

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजसह पीक कर्जात सवलती देण्याची घोषणा शासनाने केली. याविषयीचे आदेश २० मार्च रोजी काढलेत. प्रत्यक्षात ३१ मार्चच्या नावाखाली

 अमरावती : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजसह पीक कर्जात सवलती देण्याची घोषणा शासनाने केली. याविषयीचे आदेश २० मार्च रोजी काढलेत. प्रत्यक्षात ३१ मार्चच्या नावाखाली सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांजवळून २२० कोटी रूपयांची वसुली केली आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन ३ वर्षांसाठी असले तरी डिसेंबर २०१४ पर्यंतचे व्याजाचा भरणा शासन करीत आहे. त्यामुळे उर्वरित वर्षांचे व्याज हे शेतकर्‍यांना भरावे लागणार आहेत. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये मुसळधार पाऊस व गारपीट यामुळे शेतकर्‍यांची लाखो हेक्टर शेती बाधित झाली. यासाठी शासनाने २० मार्च रोजी शेतकर्‍यांना मदतीचा निर्णय घेतला. यामध्ये प्रचलित नियमाला बगल देऊन विशेष पॅकेज जारी केले. तसेच शेतकर्‍यांचे जानेवारी ते जून २०१४ पर्यंतचे कृषी पंपाचे वीज बिल माफ, पीककर्ज वसुलीस स्थगिती व ३ वर्षांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाला शेतकर्‍यांना मदतीची अंमलबजावणीपेक्षा लोकसभा निवडणूक महत्त्वाची वाटल्याने या आदेशाकडे दुर्लक्ष केले. याचा परिणाम शेतकर्‍यांवर झाला आहे. शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नाही. जिल्हा प्रशासनाने २० मार्चच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस तत्परता न दाखविल्याने आर्थिक वर्ष अखेर (३१ मार्च) चा धाक दाखवून राष्ट्रीयीकृत बँकांनी २२० कोटी रूपयांचे पीक कर्ज वसूल केले. कर्ज वसुली करू नये याविषयीचे कुठलेही आदेश बँकांना प्राप्त झाले नाही, असे सांगून कर्ज वसुली सुरूच ठेवली. नियमित बँक खाते राहून पुन्हा नव्याने कर्ज मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी पीक कर्जाचे खाते नील केले आहेत. पुनर्गठनाच्या नावाखाली पीककर्जाचे तीन वर्षांचे हप्ते पाडण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात शासन केवळ डिसेंबर २०१४ पर्यंतचेच व्याजाचा भरणा करणार आहे. शेतकर्‍यांना मदतीच्या नावावर शासनाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)