शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थ नव्हे, नानाविध आजारांचीच विक्री!

By admin | Updated: August 6, 2014 01:28 IST

उपाहारगृह, हॉटेल्सच्या किचनमध्ये अस्वच्छतेचा कळस

अकोला: पावसाळ्य़ाचे दिवस..दमट वातावरण..कीटकजन्य आजारांना वाट करून देण्यासाठी पोषक वातावरण..माशांचा संचार.. अशा परिस्थितीत हॉटेल्सच्या अस्वच्छ किचनमध्ये तयार झालेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारणे म्हणजे आजार विकत घेण्यासारखेच आहे. अकोला शहरातील अनेक हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये अस्वच्छ वातावरणातच खाद्यपदार्थ बनविले जातात. यासंदर्भात लोकमतने शहरातील निवडक हॉटेल्सची पाहणी केली असता, बहुतांश हॉटेल्सचे किचन अस्वच्छ आढळून आले. अकोला शहरातील उपाहारगृह आणि हॉटेल व्यवसायिक त्याच्या किचनच्या (स्वयंपाकगृह) स्वच्छतेबाबत कितपत काळजी घेतात, याचे स्टिंग ऑपरेशन लोकमतने सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस केले. हॉटेल आणि उपाहारगृहांच्या किचनमध्ये लोकमत चमूच्या सदस्यांनी पाहणी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. मळकट कपडे घातलेले स्वयंपाकी (कुक), घाणीने माखलेले ओटे, बाजूलाच कचर्‍याचे ढीग, तळण्यासाठी वापरण्यात येणारी गंजलेली भांडी, जळलेले तेल आणि निकृष्ट धान्य व पालेभाज्यांचा वापर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी होत असल्याचे आढळून आले. भांडी धुण्याची जागा शौचालयापुढे, पाण्याची टाकी महिनोगणती स्वच्छ न झाल्याने त्यात साचलेले शेवाळ आणि ग्राहकांना पाणी देणारे वेटर्स टाकीतच हात बुडवून ग्राहकांपुढे पाण्याचे ग्लास ठेवत असल्याचे किळसवाणे चित्र अनेक हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये पहावयास मिळाले.