५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या -जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 12:10 IST2022-08-29T12:06:51+5:302022-08-29T12:10:01+5:30
रविवारी अमरावतीत जयंत पाटील यांनी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या -जयंत पाटील
अमरावती- आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागा तसेच किमान ५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी द्या असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले,
रविवारी अमरावतीतजयंत पाटील यांनी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. संजय खोडके यांचे नेतृत्वात अमरावती शहरात राष्ट्रवादी चांगली संघटना निर्माण झाली आहे नक्कीच आगामी महापालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास या निमित्ताने वाटतो असेही जयंत पाटील यांनी सांगितले.