शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

पर्यायी जागा नाही; रखडली ८१३० घरकुले, यंत्रणाही हतबल

By जितेंद्र दखने | Published: July 20, 2023 6:17 PM

लाभार्थ्याची घरासाठी घरघर; रेडी रेकनर दरात खरेदीतही अडथळा

अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेसह घरकुलाच्या इतर योजनांमार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ९४ हजार ३२८ कुटुंबांना घरे द्यायची होती. परंतु जागाच उपलब्ध नसल्यामुळे अद्याप ८ हजार १३० घरे रखडली आहेत. प्रशासनाने या मुद्द्यावर अनेक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात फारसे यश येत नसल्याने यंत्रणाही हतबल झाली आहे.आजघडीला जी घरे रखडली आहेत, त्या कुटुंबांकडे स्वतःची जागा नाही. त्यामुळे सरकारी जागेवर ते विसंबून आहेत. मात्र गावात थोड्याफार प्रमाणात उपलब्ध असलेली सरकारी जागा ही गायरान जमीन असल्यामुळे ती घरकुलासाठी वापरता येत नाही.

सन २०१५ चा कायदा त्यासाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे पर्यायी जागा शोधून या कुटुंबांना घरे देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने विशेषतः जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. परंतु गायरान क्षेत्र वगळता पर्यायी सरकारी किंवा निमसरकारी जागा उपलब्ध नाही आणि खासगी जागा विकत घेऊन घरे बांधण्यास अर्थसहाय्य करतो म्हटले तर ५० हजारांपर्यंत जागा खरेदी करणे शक्य नाही. कारण कायद्यानुसार अशी जमीन खरेदी करायला रेडीरेकनरचा वापर करावा लागतो. शिवाय जमिनीची महत्तम किंमत ५० हजारपेक्षा अधिक होता कामा नये. त्यामुळे पात्रता असताना संबंधित कुटुंबे घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. ही संख्या २३ बांधण्याचा मार्ग मोकळा करायचे म्हटले त रेडी रेकनरनुसार जमीन विकायला कोणी तयार नाही, अशा विचित्र कात्रीत हे कुटुंबी अडकले. त्यामुळे आम्ही शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनाची वाट पाहतोय, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तालुकानिहाय जागा नसलेले लाभार्थी

अचलपूर १४६९,अंजनगाव सुजी ४००,भातकुली ११९६,चांदूर रेल्वे १६०,चांदूर बाजार ७३०,चिखलदरा १८,दर्यापूर ५४२,धामनगांव रेल्वे ३३४,धारणी १८२,मोर्शी ६५५,नांदगाव खंडेश्वर १२६,तिवसा ९४,वरूड ७३५

चौदा तालुके मिळून जिल्ह्यात आजघडीला ८१३० घरकुलांचे प्रस्ताव केवळ जागे अभावी पेडींग आहेत. तर सध्याच्या १ हजार ७०० कुटुंबातील इतर सदस्यांकडे पर्यायी जागा आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.कुटूंबप्रमुखांनी घरकुलासाठी लाभ जागा असल्यास संमतीपत्र,बक्षीस पत्र दिल्यास अशा लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ घेता येवू शकतो.

- अविश्यांत पंडा, सीईओ, जिल्हा परिषद

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाAmravatiअमरावती