शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

ट्रॅव्हल्स उलटून नऊ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

चालक मतीन अहमद नाजीर अहमद (५०), संगीता दीपक बिडकर (४२), श्याम बबनराव देशमुख (दोघेही रा. अमरावती), शरद विश्वासराव ढेपे (रा.माजरी मसला), तुषार प्रमोद मोडक, कल्याणी तुषार मोडक (दोघे रा. राजूरवाडी), बळीराम शिवानी गडवे (रा. औरंगाबाद), सुरेश सुखचंद आहुजा (रा. अकोला), जय सुरेश देशमुख (रा. औरंगाबाद), सुरेंद्र अंबादास कावरे (रा.हातुर्णा), अशी जखमींची नावे आहेत.

ठळक मुद्देवरुडानजीकची घटना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

बडनेरा : नाशिकहून अमरावतीकडे येणारी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ८ वाजता वरुडा गावानजीकच्या एक्स्प्रेस हायवेवर उलटली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाला झोपेची झपकी आल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन उलटल्याची माहिती पुढे आली आहे.चालक मतीन अहमद नाजीर अहमद (५०), संगीता दीपक बिडकर (४२), श्याम बबनराव देशमुख (दोघेही रा. अमरावती), शरद विश्वासराव ढेपे (रा.माजरी मसला), तुषार प्रमोद मोडक, कल्याणी तुषार मोडक (दोघे रा. राजूरवाडी), बळीराम शिवानी गडवे (रा. औरंगाबाद), सुरेश सुखचंद आहुजा (रा. अकोला), जय सुरेश देशमुख (रा. औरंगाबाद), सुरेंद्र अंबादास कावरे (रा.हातुर्णा), अशी जखमींची नावे आहेत. याशिवात इतर प्रवासीदेखील किरकोळ जखमी झाले आहे. नाशिकहून निघालेली ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २७ बीएक्स १६११ अमरावतीत दाखल होत असताना बुधवार सकाळी बडनेरा हद्दीतील वरूडा गावानजीकच्या एक्स्प्रेस हायवेवर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स वरूडा गावानजीक पोहोचली. थेट दुभाजकावर चढून रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. ट्रॅव्हल्सची गती कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. माहितीवरून बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅव्हल्समधील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना इर्विन रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बडनेरा पोलिसांनी सुरू केली होती.

टॅग्स :Accidentअपघात