नऊ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली, मुख्याधिका-यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 07:58 PM2017-11-13T19:58:29+5:302017-11-13T19:59:03+5:30

वरुड/अमरावती : वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर यात असमाधानकारक प्रगती करणा-या ग्रामसेवकांवर कठोर करावाई करण्याचे सुतोचाव अमरावतीचे मुख्याधिकारी किरण कुळकर्णी यांनी केले.

Nine gram sevaks stopped increments, chief's orders | नऊ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली, मुख्याधिका-यांचे आदेश

नऊ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली, मुख्याधिका-यांचे आदेश

googlenewsNext

वरुड/अमरावती : वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर यात असमाधानकारक प्रगती करणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोचाव अमरावतीचे मुख्याधिकारी किरण कुळकर्णी यांनी केले. यासोबतच वरूड व मोर्शी तालुक्यातील नऊ ग्रामसेवकांचे वार्षिक वेतनवाढ ताबडतोब रोखण्याचे आदेशही दिले.
अमरावती जिल्ह्यातील तीन तालुके आतापर्यंत हगणदारीमुक्त झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याची घोषणा मुख्याधिकारी यांनी केली आहे. या अनुषंगाने गटविकास अधिका-यांची बैठक झाली. सोमवारी वरूड व मोर्शी तालुक्यातील ग्रामसेवकांची सभा घेण्यात आली. ज्या ग्रामपंचायतींची वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रगती असमाधनाकारक आहे अशा सरपंच व सचिवांना १२ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत मुख्याधिका-यांनी दिली. तालुक्यात सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त न झाल्यास संबंधित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई मला टाळता येणार नाही, असे कुळकर्णी म्हणाले.
त्याचप्रमाणे दरमहा आढवा घेऊन सर्वांत कमी प्रगती असणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंच व सचिवांची सुनावणी घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे संकेत दिले. हगणदारीमुक्तीसाठी प्रयत्न न करणाºया कर्मचाºयांना मी सोडणार नाही, अशा शब्दांत किरण कुळकर्णी बोलते झाले.

सरपंचांवर करणार कारवाई
हगणदारीमुक्तीच्या कामात सहकार्य न करणा-या सरपंचांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलन ३९ (१) अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, अशी ताकीद यावेळी मुख्याधिकारी कुळकर्णी यांनी दिली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Nine gram sevaks stopped increments, chief's orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.