पूर्णा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले
By Admin | Updated: August 6, 2015 01:24 IST2015-08-06T01:24:07+5:302015-08-06T01:24:07+5:30
सोमवार रात्रीपासून तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ४२ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलास मिळाला आहे.

पूर्णा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले
चांदूरबाजार : सोमवार रात्रीपासून तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ४२ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलास मिळाला आहे. तालुक्यातील सातही मंडळात १०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ही अतिवृष्टी असून पूर्णा धरणाचे ९ दरवाजे ५० सें.मी. उघडण्यात आले. गेल्या २४ तासांत मध्य प्रदेशातून प्रती सेकंद ३१० घ.मी. पाणी पूर्णा धरणात येत असल्याने पाण्याची पातळी ४४९.५० मीटरपर्यंत पोहोचली आहे. या महिन्यात धरणात ६० टक्केच पाणी अपेक्षित आहे. मात्र, जलसाठा ७६ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती प्रकल्प अभियंता आशिष राऊ त यांनी दिली.