शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना होतो रात्रीचा दिवस

By admin | Updated: February 28, 2015 00:38 IST

रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना परवाना विचारला जातो. परवाना नसल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यामुळे परवाना काढायला गेल्यास रात्र जागून ....

परतवाडा : रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना परवाना विचारला जातो. परवाना नसल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यामुळे परवाना काढायला गेल्यास रात्र जागून रांगेत उभे राहावे लागत असताना परतवाडा येथील आरटीओ कॅम्पमध्ये दिले जाणाऱ्या परवान्याची संख्या वाढवून देणे आवश्यक आहे. तसेच कॅम्पचेही दिवस वाढविणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांना सोयीचे होईल.शासनाच्या नियम व कायद्याचे पालन व्हावे याकरिता नागरिक सकारात्मक पाऊल उचलत असताना अशा कार्यात प्रशासनाने याकरिता तातडीने कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय योजना यशस्वी करणे आवश्यक असताना आरटीओ कॅम्पमध्ये वेगळे चित्र पहावयास मिळते. अचलपूर तालुक्यातील अनेक वाहन चालक नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून वाहन चालविण्याकरिता आवश्यक असणारा परवाना काढण्याकरिता परतवाडा येथील विश्रामगृह येथे होणाऱ्या आरटीओ कॅॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. परंतु आरटीओ विभागाने एका कॅम्पमध्ये केवळ १०० लर्निंग व ७० परमनंट असा आकडा निश्चित केला असल्याने यामध्ये आपला नंबर लागण्यासाठी अनेक नागरिक ठरलेल्या कॅम्पच्या आदल्याच दिवशी विश्रामगृहासमोरील मैदानात रात्र जागून काढताना दिसतात. शासन एकीकडे ई-प्रशासन ही संकल्पना राबवत असताना वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी नागरिकांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो या विश्रामगृहावर महिन्याच्या दहा आणि वीस तारखेला पाहायला मिळते.या परवाना मिळविण्याकरिता होत असलेल्या त्रासाबद्दल उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांना संतप्त भावना व्यक्त करीत या कॅम्पमधील परवाना मर्यादा वाढवून देण्यात यावी अन्यथा कॅप रोज घेण्यात यावा, अशी मागणीदेखील केली आहे. यात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनी आपली रोजंदारी पाडून परवान्याकरिता उपस्थित राहावे लागते. एकीकडे नागरिक शासनाचे नियम पाळताना दिसत असताना मात्र शासन त्यांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी अचलपूर तालुक्याची लोकसंख्या पाहता आरटीओ विभागाचे स्थायी स्वरुपात उपविभागाचे कार्यालय स्थापित करून सुविधा उपलब्ध करणे आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)